banner 728x90

मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडला थेट जोडणाऱ्या दोन नवीन रेल्वेची घोषणा.

banner 468x60

Share This:

गोंदिया जिल्हा शेजारील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाटच्या खासदार भारती पारधी यांच्या मागणीनुसार दोन गाड्या देण्यात आल्या आहेत .भविष्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मध्ये रेल्वे प्रवासासाठी येणारा काळ चांगला असणार आहे.

दोन्ही राज्यात कोट्यवधी रुपयांचे रेल्वे प्रकल्प सुरू आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर रेल्वे वाहतुकीला गती मिळेल. यापूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला मोठी भेट दिली आहे. आता मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडला थेट जोडणाऱ्या रिवा- गोंदिया – पुणे आणि जबलपूर – गोंदिया – रायपूर या दोन नवीन गाड्यांची घोषणा करून अंतर कमी केले आहे.रेल्वेमंत्र्यांच्या या घोषणेचा फायदा व्यावसायिकांना, विद्यार्थ्यांना आणि नोकरदारांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. यातील

banner 325x300

पहिली ट्रेन जबलपूर ते रायपूर (जबलपूर-नैनपूर-बालाघाट मार्गे गोंदिया, नंतर रायपूर) आणि दुसरी ट्रेन रिवा ते पुणे (रिवा -सतना-जबलपूर-नैनपूर-बालाघाट- गोंदिया, नंतर नागपूर मार्गे पुणे) धावेल. या रेल्वे मार्गामुळे उत्तर आणि दक्षिणेकडील अंतर २३८ किमीने कमी होते. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. या संदर्भात अधिकची माहिती देताना बालाघाटच्या खासदार भारती पारधी म्हणाल्या की, जिल्ह्यातील प्रवाशांची बऱ्याच काळापासून लांब पल्ल्याच्या गाड्यांची मागणी होती. त्यांनी या करिता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.

गोंदिया हे महाराष्ट्राचे मुख्य स्थानक बनत आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे गोंदिया जंक्शन हे रेल्वेला अधिक महसूल देणारे मुख्य स्थानक आहे. येथून दररोज ५० हून अधिक गाड्या धावतात. येथून रेल्वे प्रवासी देशातील कोणत्याही राज्यात थेट ट्रेनने सहज प्रवास करू शकतात. मुंबई, नागपूर, कोल्हापूर, कोलकाता, हावडा, चेन्नई, हैदराबाद किंवा दिल्ली, भोपाळ, आग्रा, झाशी, जयपूर, जोधपूर, सुरत, अहमदाबाद, रायपूर, टाटानगर, विशाखापट्टणम, पुरी किंवा बालाघाट, जबलपूर, रीवा, गोंदिया हे प्रत्येक प्रमुख शहरासाठी मुख्य स्टेशन बनले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!