यंदा प्रजासत्ताक दिनाच्या (26 January 2025) निमित्ताने दिल्लीच्या कर्तव्यपथ संचालनासाठी महाराष्ट्राच्या चित्ररथला स्थान मिळाले नाही. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संचलनासाठी यंदा १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले आहेत.
मात्र या यादीत तुर्तास महाराष्ट्राला स्थान (Maharashtra Chitrarath) मिळालेले नाही.
या राज्यांना मिळाले स्थान
चित्ररथसाठी स्थान मिळालेले राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, चंडीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि हरियाणा या राज्यांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्राला 14 वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठी पुरस्कार
दिल्लीच्या कर्तव्यपथवर आतापर्यंत महाराष्ट्राला 14 वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठी पुरस्कार मिळाले आहे. यामध्ये ७ वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिले पुरस्कार, 4 वेळा दुसरे आणि 2 वेळा तृतीय पुरस्कार मिळाले आहे. तर एकदा महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकप्रिय श्रेणातही पहिले स्थान मिळाले आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला सलग 3 वर्ष सर्वोत्तम चित्ररथाचे पहिले पुरस्कार मिळाले आहे.
तीन वर्षाच्या नियमानुसार यंदा स्थान नाही
संरक्षण मंत्रालयाच्या नियमानुसार, प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात चित्ररथ निवडण्याबाबत काही निकष ठरविले आहे. राज्यांकडून दरवर्षी येणाऱ्या तक्रारीअनुसार प्रत्येक राज्याला तीन वर्षांतून एकदा तरी चित्ररथ सादर करण्याची संधी मिळेल, असा नियम केला आहे.