banner 728x90

Maharashtra Council 2024 : कल्याण घटनेप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने

banner 468x60

Share This:

कल्याणमधील योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये अखिलेश शुक्ला याने अभिजीत देशमुख यांना बाहेरून गुंड आणून मारहाण केली आहे. लोखंडी रॉडने मारहाण करत भाषिक शेरेबाजी केली आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उपस्थित झाला असून राजकारण तापताना दिसत आहे. कल्याण घटनेचे पडसाद आज विधान परिषदेतही उमटले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. (Ruling party and opposition face off in Maharashtra Legislative Council over kalyan incident)

banner 325x300

अनिल परब म्हणाले की, कल्याण पश्चिमेत एका सोसायटीमध्ये धूप लावण्याच्या मुद्द्यावरून शुक्ला आणि देशमुख या दोघांमध्ये वाद झाला. तसेच चिकन मटण खावून तुम्ही मराठी लोकं घाण करता. मी मंत्रालयात काम करतो मला मराठीचे सांगू नकोस, तुझ्यासारखे 56 मराठी माझ्यासमोर झाडू मारतात. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला तर तुमची पूर्ण मराठीची हवा निघून जाईल. तुम्ही माझं काही करू शकणार नाही. एवढंच नाही तर अमराठी कुटुंबाने बाहेरून गुंड मागवून मराठी कुटुंबियांच्या घरात घुसून लोखंडी रॉडने जबर मारहाण केल, अशी माहिती परब यांनी दिली.

अनिल परब म्हणाले की, गुंडांनी केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीच्या डोक्याला जबर मार बसला आहे. मात्र या मारहाणीनंतरही शुक्ला यांच्यावर पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. मुलुंड, गिरगाव येथेही मराठी महिलांनाही अपमानित करण्यात आले. भाजपाचे सरकार आल्यापासून मुंबई शहरात परप्रांतीयांची मुजोरी वाढत चालली आहे आणि याला महायुतीचे अभय आहे का? मुंबईचे आणि महाराष्ट्राचे गुजरातीकरण चालले का? असा प्रश्न उपस्थित करत अनिल परब यांनी नाव न घेता भाजपावर निशाणा साधला. त्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अनिल परब यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, विखे पाटील म्हणाले की, आम्ही सुद्धा मराठीचा अपमान सहन करणार नाही. पण विरोधक कल्याण घटनेचे राजकारण करत आहेत. परंतु महायुती कायम मराठी माणसांच्या पाठीशी उभी राहिली आहे. महाविकास आघाडी कधीही मराठी माणसांच्या पाठीशी उभी राहिली नाही. महाविकास आघाडीने स्वतःची इभ्रत घालवली, असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. त्यामुळे विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. भाई जगताप, सचिन अहिर आणि अनिल परब या नेत्यांनी सभापतींच्या आसनासमोर जात घोषणाबाजी सुरू केली. “मुंबई आपल्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” अशा घोषणा देत कल्याण दुर्घटनेतील संबंधित आरोपीवर कारवाईची मागणी केली.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!