banner 728x90

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला गंभीर वळण; नेत्यांनाही राज्यात प्रवेशबंदी

banner 468x60

Share This:

कर्नाटक सरकारचे बेळगाव मध्ये हिवाळी अधिवेशन आज ९ डिसेंबर पासून सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोध करण्यासाठी याच धर्तीवर बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केलेले असताना कर्नाटक सरकारने या मेळाव्याला परवानगी नाकारत महाराष्ट्रातील नेत्यांनाही राज्यात प्रवेशबंदी लागू केली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये असणारा सीमावाद पुन्हा एकदा चिघळताना दिसत आहे. ही वादाची ठिणगी आता नव्याने धुमसताना दिसत आहे. कर्नाटक सरकारचे बेळगाव मध्ये हिवाळी अधिवेशन आज ९ डिसेंबर पासून सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोध करण्यासाठी याच धर्तीवर बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केलेले असताना कर्नाटक सरकारने या मेळाव्याला परवानगी नाकारत महाराष्ट्रातील नेत्यांनाही राज्यात प्रवेशबंदी लागू केली आहे.

banner 325x300

आज ९ डिसेंबरला सकाळपासून या परिस्थितीला गंभीर वळण मिळत असल्याचं पाहायला मिळाले. जिथे बेळगावमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरूच असल्याचे दिसून आले. महाराष्ट्र एकीकरण समीकरण पोलिसांच्या नजरकैदेत असल्याची वस्तुस्थिती बेळगावमधून समोर आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते मालोजी अष्टेकर यांचा पोलिसांकडून पाठलाग केला जात असल्याचे पाहायला मिळाले. व्यायामासाठी बाहेर पडले असतानादेखील त्यांच्यामागे पोलिसांचा पाठलाग सुरूच असल्यामुळे मराठी भाषिकांपुढे असणारी आव्हाने पुन्हा एकदा समोर आली आहेत.

बेळगावमधील या महामेळाव्यासाठी कोल्हापूरमधून ठाकरे शिवसेनेत मोठ्या संख्येने बेळगावकडे जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांकडून कोल्हापूरच्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय दवणे यांच्यासह प्रमुख नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रवेश बंदी करण्यात आदी असून अशी नोटीस देखील बजावण्यात आल्या. महाराष्ट्र एकीकरण समीकरण समितीचे कार्यकर्ते आणि नेते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी जात असतानाच तिथे कर्नाटक पोलिसांच्या तुकडीने या नेत्यांना रोखलं. यावेळी ‘आम्हाला अभिवादन करत हार अर्पण करण्यासाठी जाऊ द्या’, अशी विनंती करूनही पोलिसांनी या विनवनीला न जुमानताच त्यांना ताब्यात घेतलं आणि गोंधळ माजला.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!