banner 728x90

Maharashtra Politics: सुप्रिया सुळेंनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

banner 468x60

Share This:

ऑपरेशन सिंदूरनंतर दहशवादाच्याविरोधात भारताची भूमिका जगाला सांगण्यासाठी परदेशी शिष्टमंडळ पाठवण्यात आले होते.

या शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. सुळे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील पुस्तके सुळे यांनी पंतप्रधान यांना भेट दिली. तसेच दौऱ्यासाठी त्यांची निवड केल्याने भारत सरकार, प्रधानमंत्री महोदय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि संसदीय कार्यमंत्री किरेनजी रिजेजू यांचे आभार व्यक्त केले.

मराठा आरक्षणाच्या वैधतेबाबत आजपासून सुनावणी

एसबीसीअंतर्गत मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाच्या वैधतेबाबत आजपासून मुंबई हायकोर्टा सुनावणी होणार आहे. विशेष खंडपीठासमोर सायंकाळी पाच वाजता सुनावणी सुरु होईल. मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्याचा आक्षेप याचिकांमधून घेतला आहे. दरम्यान, सरकारने दिलेले मराठा समाजाला दिलेले 10 टक्के आरक्षण हे सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात दिले गेले आहे.

देवेंद्र फडणवीस माझे बाप नाही, ठाण्यात बॅनरबाजी

मंत्री नितेश राणे यांनी महायुतीचा बाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी राणेंच्या वक्तव्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्षेप घेतला होता.आता ठाणे शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहप्रवक्ता तुषार रसाळ भलामोठा बॅनर लावला. या बॅनरमध्ये’मी तुषार दिलीप रसाळ… दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता (बाप). श्री. देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत.’ असे लिहिले आहे. तसेच मराठी वाघांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावे, असे देखील बॅनवर लिहिलेले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!