राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे सकाळी आणि संध्याकाळी वातावरण थंड राहिल, विशेषतः अंतर्गत भागांत जसे विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची तीव्रता जास्त असेल.
तसेच कोकण किनारपट्टीवर अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी सकाळी हलके धुके असू शकते. चला जाणून घेऊयात 26 डिसेंबर रोजी राज्यातील एकूण वातावरण.
कोकण विभाग :
मुंबई आणि कोकण भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईमध्ये कमाल तापमान 30-32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान हे 18-20 अंश सेल्सिअस ऐवढं असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्याच प्रमाणे काही ठिकाणी अनुकूल, तसेच सकाळी हलक्या स्वरुपाचे धुके दाटून येण्याची अधिक शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील पुण्यातील किमान तापमानात 0-12 अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. तसेच दुसरीकडे कमाल तापमान 28-30 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हवामान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. नाशिक आणि अहिल्यानगर सारख्या भागांत रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी जाणवेल.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडसारख्या शहरात सकाळी बोचरी थंडी जाणवेल. तसेच वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 10-14 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 28-30 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
नाशकात राडा, ठाकरेंच्या युतीनंतर पेढे वाटणारे विनायक पांडे भाजपात जाणार, पण फरांदेंनी वाट अडवली अन्
विदर्भ विभाग :
विदर्भ विभागात 26 डिसेंबर रोजी राज्यात सर्वाधित प्रभाव जाणवणार आहे. तसेच किमान तापमान हे 8-12 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी शीतलहरीची स्थिती निर्माण होऊ शकते.
















