गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड उष्णता, वादळी वारा आणि हलक्या पावसाच्या सरी कोसळल्याचं पाहायला मिळालं. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा गडगडाट हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.
अशातच राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट, कोरंड हवामान आणि हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, कोरडं हवामान असणार आहे. तर कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगलीमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
तसच छत्रपती संभाजी नगर,जालना, बीडमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर अकोल्यात उष्णतेच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिममध्ये हवामान विभागाकडून कोणताही इशारा देण्यात आला नाही. यवतमाळ जिल्ह्यातही उकाडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, काल सोमवारी 7 एप्रिलला पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये कोरडं वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने बांधला होता.