पावसामुळे मुंबईत एकीकडे लोकलसेवा ठप्प, दुसरीकडे रस्ते वाहतूक बंद आता चक्क मोनोरेल बंद पडल्याची घटना घडली आहे. चालती मोनोरेल बंद पडल्याने प्रवाशी घाबरले होते.
त्यानंतर एक दुसरी मोनोरेल मदतीसाठी दाखल झाली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी अग्मिशमन दलाच्या विद्युत शिडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
सायंकाळी ६.१५ वाजेदरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनो रेल्वे बंद पडली. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधला. त्याची तातडीने दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदतकार्य सुरु केले आहे.
चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेल्या मोनो रेल्वेतून प्रवाश्यांना बाहेर काढण्यासाठीबृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दलाने मदत कार्य सुरु केले असून आणखी पथके दाखल होत आहेत. तसेच महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक दाखल झालं आहे. नजिकच्या महानगरपालिका रुग्णालयास सुसज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गुदमरल्याने प्रवाशांनी काच फोडली होती. त्यामुळे आतमध्ये हवा जाण्यास मदत झाली. मोनोरेलमध्ये तब्बल २०० प्रवाशी अडकले होते. अग्मिशन दलाच्या टीमने मदतकार्याद्वारे प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं जात आहे.