banner 728x90

मुंबई हादरली! लोकल अन् पुष्पक एक्सप्रेस एकमेंकांना घासल्या, १२ जण ट्रॅकवर पडले, ५ जणांचा मृत्यू

banner 468x60

Share This:

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई लोकलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे भयंकर घटना. लोकलच्या दारात उभं असणारे ८ ते १० प्रवासी धावत्या ट्रेनमधून पटरीवर पडल्याचे समोर आले आहे.

गर्दी असल्यामुळे मिळेल ती लोकल पकडून मुंबईकर कामासाठी निघाले होते, पण या भयंकर घटनेनुळे ८-१० जण गंभीर जखमी झाल्याचे समजतेय. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समजतेय.

banner 325x300

ही दुर्घटना सकाळच्या गर्दीच्या वेळेस घडल्याने प्रचंड घबराट उडाली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून रेल्वेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. संपूर्ण तपास सुरू करण्यात आला आहे.

दिवा ते मुंब्रा या स्थानकादरम्यान आज सकाळी ९ ते ९.१५ वाजण्याच्या दरम्यान लोकल आणि एक्सप्रेस एकमेकांना घासल्याचे समोर आले आहे. कल्याणहून सीएमएमटीसाठी निघालेली ८.३६ वाजताची लोकल दिवा ते मुंब्रा स्थनकादरम्यान दुसऱ्या पटरीवर धावणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला घासली. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. रेल्वे पटरीवर १० ते १० प्रवासी रूळावर पडल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत ५ जणांच मृत्यू झाला.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाण्यासाठी मुंबईकर लोकलने प्रवास निघाले. पण गर्दी प्रचंड असल्याने अनेकजन दरात लटकत उभे होते. पण मुंब्रा-दिवा या स्थानकादरम्यान लोकल आणि ट्रेन एकमेकांना घासल्या गेल्या. दोन्ही गाड्याचा स्पीड अतिशय जास्त होता, त्यामुळे जोरात धडक झाली अन् एकच आवाज झाला. त्यामुळे लोकलमधून १० ते १२ प्रवासी पटरीवर खाली पडले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे समजतेय. दोन्ही ट्रेन एकमेंकाना घासल्यामुळे मोठा आवाज झाला अन् लोकलमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले. सध्या रेल्वेकडून या घटनेची माहिती घेतली जात आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वेकडून या घटनेची गंभीर दखल घेतली असून पूर्णपणे चौकशी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!