banner 728x90

मुंबईत नागरी सुविधांची बोंब, 46 पुरुषांसाठी एक शौचालय; महिलांचीही प्रचंड गैरसोय; तक्रारीत 70 टक्के वाढ

banner 468x60

Share This:

मुंबईत एकूण 1 लाख 59 हजार 36 शौचकुपे आहेत. मुंबईत 46 पुरुषांच्या मागे एक तर 38 महिलांच्या मागे फक्त एक शौचकूप असल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. तर मागील नऊ वर्षांत मुंबईतल्या नागरी सुविधांच्या तक्रारीत तब्बल 70 टक्के वाढ झाल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेत नागरी सुविधांबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याच्या संदर्भात विधानसभा सदस्य राजू तोडसाम यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, पाणी, शाळा रस्ते, शौचालय या नागरी सुविधांबाबतच्या तक्रारींमध्ये गेल्या दहा वर्षांत 70 टक्क्यांनी वाढ झाल्याचे नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुंबईतील नागरी सुविधांची सद्यस्थिती या अहवालातून निदर्शनास आले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. ते लेखी उत्तरात पुढे म्हणतात की, प्रज्ञा फाउंडेशन या अशासकीय संस्थेच्या वतीने मुंबईतील नागरी सुविधांची सद्यस्थिती हा अहवाल मे 2025 मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात मुंबई महापालिकेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, पाणी शाळा, रस्ते, शौचालय या नागरी सुविधांबाबतच्या तक्रारींमध्ये 2015 ते 2024 या कालावधीत 70 टक्क्यांनी वाढ झाल्याचे संस्थेच्या अहवालाचा हवाला देत लेखी उत्तरात म्हटले आहे.

कचऱयाच्या तक्रारीत 380 टक्के वाढ

या अहवालानुसार 2024 मध्ये 1 लाख 15 हजार 396 इतक्या तक्रारी आल्या आहेत. प्रदूषण, शौचालय व घनकचऱयाच्या तक्रारीत 2015च्या तुलनेत प्रदूषणात 334 टक्के, शौचालयाच्या
तक्रारीत 218 टक्के आणि घनकचऱयाच्या तक्रारीत तब्बल 380 टक्के वाढ झाल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.

पाणी गळतीचे वाढते प्रमाण

मुंबईला दररोज 4 हजार 370 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. पण पाणी गळतीमुळे प्रत्यक्षात 3976 दशलक्ष लिटर्सच पाणी उपलब्ध होते. म्हणजे दररोज सुमारे 395 दशलक्षल लिटर्स पाणी वाया जात आहे. मुंबईतल्य झोपडपट्टीमधील रहिवाशांना दररोज दरडोई 45 लिटर पाणीपुरवठा होत असल्याचे उत्तरात नमूद केले आहे.

banner 325x300

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!