banner 728x90

मुंबईकरांचा प्रवास गर्दीमुक्त होणार, लोकलच्या तब्बल १००० फेऱ्या वाढणार; कसा आहे रेल्वेचा प्लान?

banner 468x60

Share This:

मध्य रेल्वे मार्गावर काही दिवसांपूर्वी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झाालेल्या भीषण लोकल अपघातामध्ये पाच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघातानंतर भारतीय रेल्वे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या क्षमता विस्ताराचे काम जलद गतीने पूर्ण करण्याचा विचार करत आहे.

विस्ताराचे काम लवकर पूर्ण झाल्यानंतर दररोज लोकलची संख्या ४,५०० पर्यंत वाढवता येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

banner 325x300

सध्या मुंबई उपनगरीय नेटवर्कवर दररोज सुमारे ३,२०० ते ३,४०० लोकल धावतात. मुंबई लोकल नेटवर्कमध्ये १६,००० कोटी रुपयांचे क्षमता विस्तार प्रकल्प सुरू आहेत आणि वर्षाच्या अखेरीस हे प्रकल्प सुरू होतील, असे देखील या अधिकाऱ्याने सांगितले. एकट्या मुंबई आणि एमएमआरमध्ये सध्या १६ हजार कोटींची कामे सुरू आहेत. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रासाठी रेल्वे विभागाने यावर्षी ८१ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील १६ हजार कोटींची कामे सध्या सुरू आहेत.

केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलीली सर्व कामे पूर्ण झाल्यावर आणि रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढल्यानंतर रेल्वे दररोज ४,५०० लोकल चालवण्याचा प्रयत्न करेल. सध्या लोकल प्रवास करताना प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेक प्रवासी उभं राहूनच प्रवास करतात. गर्दीमुळे बसायला जागा मिळत नसल्यामुळे घरातून ऑफिसला जाताना आणि ऑफिसवरून घरी जाताना या प्रवाशांना उभं राहूनच प्रवास करावा लागतो. गर्दीमुळे अनेक अपघात होतात आणि यामध्ये प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागतात.


मुंब्रा येथे झालेल्या लोकल अपघातानंतर मुंबईतील सर्व लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली होती. ‘मुंबई लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार आहेत. येत्या नोव्हेंबरमध्ये या स्वयंचलित दरवाजांच्या प्रणालीसोबत पहिल्या लोकलची चाचणी केली जाणार आहे. लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवणे हे तांत्रिकदृष्ट्या खूपच आव्हानात्मक आहे आणि ते जुने डबे टप्प्याटप्प्याने काढून टाकण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.’


‘सध्या रेट्रोफिटिंग करणे कठीण दिसत आहे. सध्या असलेल्या डब्यांच्या दरवाज्यांमधील अंतर स्वयंचलित दरवाज्यांच्या मानक परिमाणांपेक्षा वेगळे आहे. हा एक सुरक्षिततेचा मुद्दा असल्याने नियमन आणि प्रमाणनानुसार नवीन दरवाजा विकसित करण्यास दोन ते तीन वर्षे लागतील. सध्या २५० रेक आहेत. नवीन गाड्या तयार केल्या गेल्यानंतर जुने डबे टप्प्याटप्प्याने बंद केले जातील.’, असे देखील एका अधिकाऱ्याने सांगितले.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!