banner 728x90

Musandi Movie : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मुसंडी’चं पोस्टर अनावरण

banner 468x60

Share This:

मुंबई : सध्या स्पर्धा परीक्षेवरून महाराष्ट्रात चांगलेच वातावरण पेटलेले असतानाच यूपीएससी (UPSC) आणि एमपीएससी (MPSC) या स्पर्धा परीक्षांवर भाष्य करणाऱ्या ‘मुसंडी’ या चित्रपटाचे पोस्टर अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धा परीक्षेबाबत तरुणांमध्ये चांगलीच झिंग असते. अनेक मुलं आपलं करियर पणाला लावून स्पर्धा परीक्षेच्या शर्यतीत उतरतात. त्यात यश मिळवणं सोपं नाही, पण विद्यार्थी प्रयत्नांची परायकाष्टा करून हे युद्ध जिंकतात. हाच सगळा प्रवास ‘मुसंडी’ (Musandi) या चित्रपटातून मांडला आहे.गोवर्धन दोलताडे लिखित, निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ‘मुसंडी’ हा मराठी चित्रपट 26 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टर अनावरण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुसंडी’ चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

banner 325x300

यावेळी राज्याचे मंत्री संदीपान भुमरे, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री संजय राठोड, मंत्री गुलाबराव पाटील, रामदास कदम, अर्जुन खोतकर, खासदार हेमंत गोडसे, मा. शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुहास कांदे, आमदार संजय शिरसाट, आमदार शहाजीबापू पाटील , आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार शांताराम मोरे, आमदार बालाजी कल्याणकर आणि चित्रपट निर्माते गोवर्धन दोलताडे हे उपस्थित होते.

रोहन पाटील आणि गायत्री जाधव ही जोडी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असून या दोघांसोबत सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तान्हाजी गळगुंडे, शिवाजी दोलताडे, सुरज चव्हाण, अरबाज शेख, प्रणव रावराणे, अक्षय टाक, घनश्याम दरवडे (छोटा पुढारी),सनमीता धापटे, वैष्णवी शिंदे, माणिक काळे, सुजीत मगर, मयुर झिंजे, ऋतुजा वावरे, विकास वरे, राधाकृष्ण कराळे यांच्या भूमिका आहेत.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!