banner 728x90

मोठी बातमी: 242 प्रवाशांना घेऊन जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं, अहमदाबाद विमानतळाजवळ भीषण अपघात

banner 468x60

Share This:

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचं एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली आहे. अपघातस्थळावरून आकाशात धुराचे प्रचंड लोट दिसत आहेत. दरम्यान, या अपघातानंतर बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहे.

अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटातच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

banner 325x300

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघानीनगरजवळ हा अपघात झाला. विमानतळापासून मेघानीनगरचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली.

प्राथमिक माहितीनुसार, जेव्हा या विमानाला अपघात झाला तेव्हा त्या विमानात क्रू मेंम्बर्ससह एकूण 242 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

विमानतळापासून मेघनीनगरचे अंतर सुमारे 15 किमी आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये अपघातस्थळावरून आकाशात धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळत आहेत. या दुर्घटनेनंतर आपत्कालीन प्रतिसाद पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचे कारण निश्चित केलेले नाही. मेघनीनगर परिसरातील धारपूर येथून प्रचंड धूर दिसत आहे.

अपघातस्थळी BSF आणि एनडीआरएफच्या (NDRF) टीम रवाना करण्यात आल्या आहेत. अपघातग्रस्त विमान बोईंगचे ७८७ ड्रीमलायनर असल्याचे सांगितले जात आहे, जे ११ वर्षे जुने होते.

एअर इंडियाच्या या विमानाने (AI-171) दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (IGI विमानतळ) अहमदाबादसाठी उड्डाण केले होते. ज्यानंतर येथे काही वेळ थांबल्यानंतर गुरुवारी (12 जून) दुपारी लंडनसाठी उड्डाण केलेलं असताना हाँ अपघात झाला.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!