देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
या भेटीमुळे राजकीय खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी गेले का याचीही दबक्या आवाज चर्चा सुरू आहे.
मुंबई, पुणे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. आजच्या भेटीत राजकीय चर्चा होण्याची शक्यता असल्याचंही म्हटलं जात आहे.
भाजप नेते मोहित कंबोज देखील या भेटीसाठी आधीच पोहोचले आहेत. ही भेट नियोजित नव्हती अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट होतेय. काही दिवसांपूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी निवडणुकीच्या मुद्द्यावरून बोलताना ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता. यानंतर भाजप नेत्यांकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं होतं.
आता या टीकेनंतर आज अचानक राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी सीएम फडणवीस आल्यानं चर्चांना उधाण आलंय. ही पूर्णपणे भाजप आणि मनसेची भेट असू शकते असं म्हणावं लागले. मनसेचे महत्त्वपूर्ण नेते आणि मोहित कंबोज देखील या भेटीदरम्यान उपस्थित आहेत अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या भेटीकडे राजकीय दृष्टीनं न पाहता वैयक्तिक दृष्टीनं पाहावं. ही एक मैत्रत्वाची भेट आहे. मनसेच्या काही नेत्यांकडून कानावर आलं होतं, की राज ठाकरेंनी त्यांची भेटीसाठी वेळ मागितली असं समजलं होतं. त्यांच्या राजकीय दृष्टीपलिकडे एक चांगलं मैत्रीचं नातं आहे. त्यामुळे ते आता मैत्रीच्या नात्यानं भेटले आहेत. त्यातही दोन राजकीय नेते भेटणार म्हणजे काही ना काही राजकीय चर्चा होणार ते टाळता येत नाही, ही कौटुंबिक भेट समजावी असं माझं मत असल्याची अशी प्रतिक्रिया भाजप आमदार, प्रसाद लाड यांनी दिली आहे.