आज एका माणसाने अचानक दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला केला. रेखा गुप्ता आज त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये जनसुनावणी घेत होत्या, तेव्हा त्यांच्यावर हा हल्ला झाला.
यानंतर तिथे गोंधळ उडाला. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे आणि त्याची चौकशी करत आहेत. मात्र, हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी साप्ताहिक जनसुनावणीदरम्यान मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,संबंधित व्यक्ती जनता दरबारात आला होता. तो साधारण 35 वर्षांचा आहे. त्याने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडे एक कागद दिला. त्यानंतर तो मोठ्या आवाजात रेखा गुप्ता यांच्याशी बोलू लागला, त्यांना शिवीगाळ केली. यानंतर या व्यक्तीने रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला चढवला. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी दिली.