नेपाळच्या तरुणीची पालघरमध्ये हत्या करण्यात आली आहे. प्रियकर आणि त्याच्या वडिलांनीच तरुणीची हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक आरोपी नेपाळमध्ये पळून गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते. दोघंही नेपाळमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी शिमला मार्गे ते महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल दादरा नगर हवेली येथे पोहोचले. त्यानंतर तिथे एका साथीदाराच्या मदतीने मनोर त्र्यंबक मार्गावर मोखाडा जवळ रात्री बारा वाजताच्या सुमारास या तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या करत मृतदेह पुलाखाली फेकला होता. मटारच्या गोणीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांनीदेखील मटारच्या गोणीत मृतदेह आढळून आल्याने पालघर पोलिसांनी चक्र फिरवली असून एस एल 28 या गोणी वरील मार्क वरून आरोपींचा छडा लावण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे मटार पार्सल करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोणीवरून पोलिसांना या हत्त्येचा छडा लावला आहे.
मयत तरुणी हिने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तिने प्रियकरासमोर लग्नाचा तगादा लावला होता. यालाच कंटाळून प्रियकराने आपले वडील आणि एका साथीदाराला सोबत घेत प्रेयसीचा काटा काढला असून या प्रकरणात पालघर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर आणखीन एक आरोपी पुन्हा नेपाळमध्ये पसार झाला असून त्याचा शोध सध्या पालघर पोलिसांकडून घेतला जातोय .