पालघर येथील निऑन फाउंडेशन व निऑन लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत येथे रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते यावेळी ६१२ कामगार व कर्मचारी तसेच संचालकानी स्वतःच्या कंपनीसह आसपासच्या कंपनीमधील कर्मचारी व कामगारांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. निऑन फाउंडेशन तर्फे गेली पाच वर्ष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून आतापर्यंत २७०० हून अधिक बॅगा रक्त गोळा करण्यात आले आहे
या रक्तदान शिबिरामध्ये रक्त गोळा करण्याच्या दृष्टीने पालघर जिल्हा रुग्णालय व जव्हार जिल्हा रुग्णालय ब्लड बँक तसेच सरला ब्लड बँक वसई आणि देवकीबाई कल्याणजी छेडा ब्लड सेंटर डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात ६१२ रक्त पिशव्या गोळा करण्यात आल्या. गेल्या पाच वर्षात फाउंडेशन मार्फत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांमधून बॅगा रक्त गोळा करण्यात आले हे रक्त शासकीय ब्लड बँक मधून विनामूल्य देण्यात येत असत तर खाजगी ब्लड बँकेमधून काही रक्कम भरून रुग्णांसाठी दिला जात असतं
पालघर येथील निऑन फाउंडेशन व निऑन लॅबोरेटरीज यांच्यातर्फे गेली पाच वर्ष सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असत त्याचबरोबर जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम भागातल्या जव्हार मोखाडा तालुक्यातील आदिवासींच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी हजारो वह्या वाटपाचा कार्यक्रम बाबीत असते तसेच गरीब व आदिवासींच्या घरात स्वच्छ पाणी झाकलेल्या अवस्थेत राहावे यासाठी उच्च दर्जाच्या एचडीपी प्लास्टिकचे हजारो ड्रम तसेच थंडीच्या दिवसात गरिबांच्या थंडीपासून रक्षण होण्यासाठी या भागामध्ये शेकडो ब्लॅंकेट आणि दिवाळीच्या दरम्यान महिला पुरुष व मुले मुली आणि लहान बालक यांना नवीन कपड्याच्या तसेच मिठाईचे वाटप करण्यात येत असतात.
जिल्ह्यात गरीब रुग्णाच्या ऑपरेशन अथवा उपचाराच्या मोठा खर्च असल्यास त्यामध्ये मोठा हिस्सा फाउंडेशन मार्फत रुग्णांच्या उपचारासाठी निऑन फाउंडेशन मार्फत दिला जात असतो जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोर्चे धरणे तसेच शासकीय निमशासकीय मोठे कार्यक्रम तसेच आठवडे बाजार व यात्रा या ठिकाणी स्टेनलेस स्टीलच्या टँकरद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्यात येत असतं,