banner 728x90

महाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

banner 468x60

Share This:

Maharashtra Weather Alert: राज्यासह मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत 1 ते 20 जुलैदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

पुढील दोन ते तीन दिवस पावस मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळं बळीराजादेखील सुखावला आहे.

banner 325x300

मुंबईत शुक्रवार सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. ठाण्यासह वसई आणि विरारमध्येही मुसळधार पाऊस सुरू होता. तर, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईतील दोन तलावापैकी एक असलेला तुळशी तलाव 20 जुलै रोजी भरुन वाहू लागला. तर, नागपुरातही पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा हा जोर आणखी तीन ते चार दिवस कायम राहणार असल्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत समांतर कमी दाबाचा पट्टा आहे. त्याचमुळं मुंबईसह राज्यातील अन्य भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. पुढीत दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाने दिला आहे. आजसाठी रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. यावेळी अतिमुसळधार पाऊस बरसू शकतो. तर, मुंबई,ठाणे, पालघरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, आज सकाळपासूनच मुंबईतही ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट

रायगड – ऑरेंज
रत्नागिरी – ऑरेंज
सिंधुदुर्ग – यलो
मुंबई – यलो
ठाणे – यलो
पालघर -यलो
नाशिक – यलो
कोल्हापूर – यलो
सातारा – ऑरेज
अकोल – ऑरेंज
अमरावती – ऑरेज
नागपूर – ऑरेंज
वर्धा – ऑरेंज
यवतमाळ – ऑरेंज

गडचिरोली जिल्ह्यात एकूण 27 मार्ग झाले बंद

गडचिरोली जिल्ह्यात एकूण 27 मार्ग झाले बंद झाले आहेत. संततधार पावसाने आलापल्ली- सिरोंचा मार्ग पर्यायी रस्ता वाहून गेल्याने ठप्प झाला आहे. स्थानिक स्तरावर शाळा बंदचा निर्णय घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना दिल्या आहेत. उत्तर गडचिरोलीत सर्वच तालुक्यात अतिवृष्टी झालीये. गोसेखुर्द धरणाची सर्व 33 दारं उघडली असून पावसामुळे 75 घरांची पडझड. जिल्ह्यात सरासरी 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!