banner 728x90

पालघर : भरधाव टेम्पोच्या धडकेत आश्रमशाळेतील एक विद्यार्थी ठार, एक जखमी

banner 468x60

Share This:

डहाणू तालुक्यातील तवा येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना भरधाव टेम्पोने धडक दिली. या धडकेत एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर एक जखमी आहे. सुधीर दिलीप पुंजारा (वय १७ वर्षे) अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून सनी विनोद तांबडा (१७ वर्षे) या जखमी विद्यार्थ्यावर धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

डहाणू तालुक्यातील तवा येथील शासकीय आश्रम शाळा येथे दोन विद्यार्थी १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होते. ही आश्रम शाळा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत आहे. सोमवारी शाळा सुटल्याने हे दोघे विदयार्थी हे अनिवासी असल्याने संध्याकाळी घरी ५ च्या सुमारास जात असताना महामार्गावरील चिंचपाडा येथे गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव टेम्पोने पाठीमागून दोघांना जोराची धडक दिली. या अपघातात सुधीर पुंजारा या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून सनी विनोद तांबडा (१७ वर्षे) हा जखमी झाल्याने त्याला कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टेम्पोचालक वाहनासह फरार झाला असून याबाबत त्याच्याविरोधात कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!