banner 728x90

पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त

banner 468x60

Share This:

महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत मोठी कारवाई करत पाकिस्तानमधून आलेला ९ कोटी किमतीचा माल जप्त केला आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

डीआरआयने १११५ मेट्रिक टन वजनाचे आणि ९ कोटी किमतीचे पाकिस्तानचे ३९ कंटेनर ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी आयातदार कंपनीच्या एका भागीदाराला २६ जून रोजी अटकही करण्यात आली आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या आयातीवर बंदी
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानमधून थेट किंवा अप्रत्यक्षपणे होणाऱ्या आयातीवर प्रतिबंध लादले आहेत. या प्रतिबंधांनंतरही, संयुक्त अरब अमिराती (UAE) मार्गे पाकिस्तानमधून भारतात माल आयात केला जात होता. सरकारने २ मे २०२५ पासून पाकिस्तानमधून येणाऱ्या कोणत्याही मालाच्या आयात किंवा वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. यापूर्वी अशा मालावर २००% सीमाशुल्क आकारले जात होते. तरीही, काही आयातदारांनी मालाचे मूळ लपवून आणि शिपिंग दस्तऐवजांमध्ये हेराफेरी करून या प्रतिबंधांना बगल देण्याचा प्रयत्न केला.

न्हावा शेवा बंदरावर कंटेनर जप्त
भारतात येणारे हे कंटेनर युएईचे असल्याचे भासवून आयात केले जात होते, परंतु त्यांना नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरावरच जप्त करण्यात आले. डीआरआयच्या तपासणीत असे समोर आले आहे की, हा माल पाकिस्तानमधील कराची बंदरातून दुबईच्या जेबेल अली बंदर मार्गे भारतात आणला जात होता. या आयातीमागे पाकिस्तानी आणि युएईतील नागरिकांची मिलीभगत असल्याचे उघड झाले आहे. यात एक आर्थिक आणि लॉजिस्टिक नेटवर्क कार्यरत होते. यातून अवैध आर्थिक व्यवहार होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानमधील व्यावसायिक संस्थांशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि पैशांचा मागही काढण्यात आला आहे. पाकिस्तानमधील व्यावसायिक संस्थांशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि मनी ट्रेलचाही शोध घेण्यात आला आहे. DRIने सध्याची परिस्थिती लक्षात घेता ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि गुप्तचर यंत्रणा आणखी मजबूत केल्या आहेत. गुप्तचर माहिती आणि डेटा विश्लेषण वापरून पाकिस्तानी मूळच्या वस्तूंच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!