Breaking News
‘भाजप जिल्हाध्यक्षांच्या बदनामीवरून महायुतीत तणाव’ शिवसेनेच्या शिंदे गटाविरुद्ध भाजप आक्रमक थेट बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार राजीव नानांच्या पुढाकाराने ‘प्रोटेक्ट एन. जि.ओ.’पालघर जिल्ह्याचे हित जपणार. भरत राजपूतच पालघरचे ‘किंगमेकर’ पालघर जिल्ह्यात भाजपला मिळवून दिल्या ९४ पैकी पन्नास जागा विरोधकांच्या एकीलाही शह राज -उद्धव ठाकरे एकत्र, आज दुपारी ऐतिहासिक युतीची घोषणा, जागावाटप ठरलं, कोण किती जागांवर लढणार? वाचा मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षकांच्या मोबाईलचेही सुरु राहणार कॅमेरे; प्रत्येक वर्गात असणार सीसीटीव्ही, यंदा प्रथमच पर्यवेक्षकांची सरमिसळ
banner 728x90

पालघरचा भविष्यवेध: लाखो रोजगार, विमानतळ आणि चौथी मुंबई— CM फडणवीसांनी मांडला मोठा प्लॅन

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

विरोधकांच्या लंकेचे भरत राजपूत करतील दहन

banner 325x300

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना उत्तर

दोन तारखेला कमळाची चिंता करा, पुढची पाच वर्ष मी तुमची चिंता करतो

पालघरः नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने विरोधकांनी भरत राजपूत यांचा उल्लेख लंकेचा रावण असा केला असला, तरी त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. आपला पक्ष हा प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन चालणारा आहे आणि भरत हे तर प्रभू श्रीरामांच्या भावाचे नाव आहे. त्यामुळे विरोधकांच्या रावणाचे दहन आपला भरतच करील, अशा शब्दांत कुणाचेही नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. भरत राजपूत यांना निवडून दिले, तर महाराष्ट्राचे अख्खे सरकार तुमच्या पाठीशी उभे करू, अशी ग्वाही त्यांनी दिली

डहाणूचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत राजपूत यांच्यासह नगरसेवक पदाच्या २७ उमेदवारांच्या प्रचारासाठी आज सकाळी फडणवीस यांची सभा झाली. त्या वेळी बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेचा थोडक्यात समाचार घेऊन विकासाच्या मुद्द्यावर भर दिला. कोणावही टीका करण्यासाठी मी येथे आलेलो नाही, तर सकारात्मक विकासाच्या मुद्यावर बोलायला येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी रजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. २६ नोव्हेंबर हा संविधान दिन असल्याने संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन मुख्यमंत्र्यांनी केले. या वेळी व्यासपीठावर पालकमंत्री गणेश नाईक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, बाबाजी काटोळे, जगदीश राजपूत, पंकज कोरे, रोहींटन झाईवाला, विशाल नांदलसकर यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

भरत हा रावण कसा असू शकतो?
राजपूत यांनी आपल्या भाषणात लंका आणि रावणाचा संदर्भ दिला होता, त्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, की रामायणात भरत हा प्रभू रामाचा भाऊ आहे. तो लंकेचा रावण कसा असू शकतो आणि आपला पक्ष हा तर प्रभू रामांना मानणार आहे. त्यामुळे विरोधकात जे कोणी रावण असतील, त्यांचे दहन विकासाच्या माध्यमातून हा भरतच करणार आहे आणि त्यासाठी त्याला आवश्यक असलेली सर्व ताकद पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष तसेच मी त्याच्या पाठीशी निश्चित उभी करील, याची तुम्ही खात्री बाळगा. केंद्र सरकार आणि राज्य सरकार शहरांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देत असून या निधीचा पारदर्शकपणे वापर करून त्यात घोटाळे न करणारे लोक असले पाहिजेत आणि भरत हे अशाच प्रकारचे व्यक्तिमत्व आहे, की ज्याला विकास कसा करतात, फाईल कुठून कशी हलवता येते आणि विकासासाठी निधी कसा आणता येतो हे माहिती आहे. पूर्वी त्यांनी काम केले आहे. त्यामुळे डहाणूमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी भरतच्या पाठीमागे जनतेने खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.

चौथी मुंबई, विमानतळ आणि रोजगार
पालघर जिल्ह्याच्या समग्र विकासाचे चित्र रंगवताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की पालघर हा आदिवासी जिल्हा असला, तरी आता त्याचे स्वरूप बदलते आहे. हा जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर येतो आहे. वाढवण बंदर येथे होत असून त्यामुळे दहा लाख भूमिपुत्रांना रोजगार मिळणार आहे आणि हा रोजगार काढून घेण्यात कुणी प्रयत्न केला, तर मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः पुढे येईल. त्याचबरोबर येथे आपण विमानतळ करतो आहोत. चौथी मुंबई पालघर जिल्ह्यातच विकसित होत आहे. डहाणूचे नैसर्गिक सौंदर्य जपताना येथे खंडीत झालेला विकासही आपल्याला पुन्हा सुरू करायचा आहे. नैसर्गिक सौंदर्याचा बागुलबुवा करून, विकासाला विरोध करून उपयोग नाही, तर येथे असलेल्या वैशिष्टयांसह विकास कसा करता येईल यावर आमचा भर आहे.

शहरांच्या विकासावर भर
महाराष्ट्रात ४० हजार खेड्यांमध्ये साडेसहा कोटी लोक राहतात, तर चारशे शहरांमध्ये तितकेच लोक राहत असून आता शहरांचे बकालपण, झोपडपट्ट्या, कचऱ्याचे ढीग, सांडपाणी अशा प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या योजनांचा आपल्याला आधार घ्यावा लागेल. त्यासाठी ‘अमृत’ सह इतर अनेक योजना राबवता येतील. टाकाऊतून संपत्ती कशी निर्माण करता येईल अशा योजना हाती घेता येतील. डहाणूतील अतिक्रमणे नियमित करून बेघर लोकांना पंतप्रधान आवास योजनेतून घर द्यावे लागेल. यासाठीच्या सर्व योजना भरत राजपूत यांच्या माध्यमातून आपल्याला राबवता येतील. डहाणूच्या चिकूची निर्यात त्यांच्याच माध्यमातून सुरू झाली. आता येथे आपल्याला बाजार समिती सुरू करायची आहे. डहाणूच्या विकासाला गती द्यायची आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करायची आहे, कचऱ्यापासून खत तयार करायचे आहे.

निधी योग्य व्यक्तींच्या हाती
केंद्र आणि राज्य सरकारच्या हजारो कोटी रुपयांचा निधी अन्य कुणा मध्यस्थांच्या हाती हाती जाऊ न देता योग्य माणसाच्या हाती सोपवायचा आहे, त्यासाठीच त्यासाठी विचारधारेवर चालणाऱ्या आणि ज्यांना कामाचा अनुभव आहे, अशा कार्यकर्त्यांच्या हाती आपल्याला नगरपालिका सोपवायचची आहे, असे ते म्हणाले

डहाणूत परिवर्तन
या वेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी भारत राजपूत यांच्या कार्य कौशल्याचा, त्यांच्या संघटन चातुर्याचा उल्लेख करून त्यांच्या हाती नगरपालिका दिली, तर डहाणूमध्ये परिवर्तन घडेल असा विश्वास व्यक्त केला, तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाने पालघर जिल्ह्यात संघटन कधीपासून सुरू केले याचा उल्लेख करून चिंतामण वनगा, विष्णू सावरा आदींपासून भाजपचा येथे पाया रचला गेला आहे, हे सांगितले. लोकसभा, विधानसभेत भाजपने येथे चांगले यश मिळवले असून आता नगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे निवडणुकीतही भाजप चांगले यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला.

विकासाचा आढावा आणि भवितव्यातील योजना
प्रास्ताविकात भरत राजपूत यांनी २०१७ पासून नगरपरिषद ताब्यात आल्यानंतर केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्याचबरोबर आगामी काळात डहाणूचे काय प्रश्न आहेत आणि ते कसे सोडवता येतील याचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी काही मागणीही मांडल्या. त्यात भूमिगत गटारीसह अन्य योजनांचा समावेश आहे. आपण जनतेत राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे विरोधक एकत्र आले असून ते रावणाची लंका दहन करण्याची भाषा करतात. आपण खरेच रावण आहोत का, आपली दहशत आहे का असे सवाल करून त्यांनी कार्यकर्त्यातूनच त्याचे उत्तर घेतले. कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने भरत राजपूत काम करत असल्याची ग्वाही दिली.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!