banner 728x90

पालघरसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर कराआ. राजेंद्र गावित यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

पालघरसह १८ गावांसाठी दोन कोटी दहा लाख लिटर क्षमतेची योजना

banner 325x300

पालघरः पालघर नगरपालिका तसेच लगतच्या गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आता पालघरजवळ चौथी मुंबई विकसित केली जाणार आहे. वेगवेगळे पायाभूत प्रकल्प, वाढवण बंदर, नियोजित आंतराष्ट्रीय विमानतळ आदी बाबी लक्षात घेता सध्याची पाणी योजना पालघरसाठी पुरेशी नाही. दोन कोटी दहा लाख लिटर प्रतिदिन क्षमतेच्या स्वतंत्र पाणी योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून, त्याला तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

नगरपालिका, पालघर जिल्हा मुख्यालय व सभोवताच्या १८ गावांसाठी सध्या पाणीपुरवठा योजना आहे. सध्या सूर्या नदीवरून दररोज एक कोटी ४० लाख लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा केला जातो; परंतु ते पाणी कमी पडते. त्यातील ऐंशी लाख लिटर पाणी पालघर शहराला, पन्नास लाख लिटर पाणी सभोवतालच्या १८ गावांना तर दहा लाख लिटर पाणी पालघर जिल्हा मुख्यालयासाठी दिले जाते; परंतु सभोतालच्या ग्रामीण भागाच्या पाण्याचा अतिरिक्त भार हा पालघर नगरपालिकेवर पडतो आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत कमी पाणी
पालघर शहर व सभोवतालच्या परिसरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता पालघर नगरपालिका व १८ गावांना पाणीपुरवठा योजनेमार्फत होणारा पाणी पुरवठा हा खूपच कमी आहे. भविष्यातील वाढते शहरीकरण व नागरीकरण लक्षात घेता आणखी पाण्याची आवश्यकता आहे. शहरांची गरज लक्षात घेता प्रतिव्यक्ती २१० लिटर पाण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेता इतर पाण्याचे स्त्रोत जलसिंचन व पाटबंधारे विभागामार्फत निर्माण करून पाण्याची सोय करता येऊ शकते.

प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात
आ. गावित यांनी शहराच्या वाढीव पाण्याची गरज लक्षात घेऊन स्वतंत्र पाणी योजनेची मागणी केली आहे. पालघर नगरपालिका, पालघर जिल्हा मुख्यालय व सभोतलाच्या १८ गावांतील वाढते नागरीकरण व नागरी सुविधामधील जीवनावश्यक बाब म्हणजे पाणी. पाण्याची ही वाढती गरज लक्षात घेता पालघर नगरपालिकेसाठी स्वतंत्र दोन कोटी दहा लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचा पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासन स्तरावर मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याला त्वरित मंजुरी द्यावी तसेच सभोतालच्या १८ गावे व पालघर जिल्हा मुख्यलायासाठी अतिरिक्त पाणी पुरवठा मंजूर करण्याची मागणी आ. गावित यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!