पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ( Paris Olympics 2024) 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योत सिंग कांस्य पदकाच्या सामन्यासाठी पात्र ठरले आहेत.
या दोघांनी अचूक लक्ष्यभेद केल्यास भारताला नेमबाजीत आणखी एक पदक मिळेल. तसेच मनू भाकर हिला सलग दुसरे पदक पटकविण्याची संधी आहे. रविवार, २८ जुलै रोजी तिने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदकावर आपली मोहोर उमटवली होती. ऑलिम्पिकमध्ये पदक पटकविणारी ती देशाची पहिली नेमबाज ठरली आहे.
कांस्यपदकाच्या लढतीत मनू -सरबज्योत पात्र
मनू भाकर आणि सरबज्योत सिंग 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक पात्रतामध्ये तिसरे स्थानासाठी पात्र ठरले आहेत. आता कांस्यपदकासाठी चौथ्या स्थानावर असलेल्या कोरियन जोडीबरोबर त्यांचा सामना मंगळवार, ३० जुलै राेजी होणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात प्रत्येकी 10 शॉट्सच्या तीन मालिका असतात. सर्वाधिक गुण मिळवणारे संघ अंतिम फेरीत प्रवेश करतो. म्हणजेच अव्वल दोन संघामध्ये सुवर्ण आणि रौप्य पदकांसाठी सामना होतो. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे संघ कांस्यपदकासाठी आमने-सामने असतात.