banner 728x90

भारतात पठाणची आगाऊ बुकिंग पूर्णपणे सुरू, रिलीजपूर्वी 5 लाख तिकिटांची विक्री

banner 468x60

Share This:

बॉलिवूडचा मेगा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) च्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. परदेशात ‘पठाण’ (Pathaan) तिकिटांचा बंपर अॅडव्हान्स दिसू लागला आहे. अशातचं आता भारतात या चित्रपटाच्या तिकिटांचे आगाऊ बुकिंग आजपासून म्हणजेच 20 जानेवारीपासून सुरू होणार आहे. शाहरुखच्या या मोस्ट अवेटेड चित्रपटाची लाखो तिकिटे भारतात अॅडव्हान्स बुकिंग विंडो उघडण्यापूर्वीच विकली गेली आहेत.

बॉलिवूड चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी रात्री उशिरा त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक नवीनतम पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तरणने सुपरस्टार शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या तिकिटांच्या आगाऊ बुकिंगबाबत नवीनतम अपडेट दिले आहे. तरण आदर्शच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय साखळीतील ‘पठाण’च्या आगाऊ बुकिंगने गुरुवारपर्यंत 1 लाख 17 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ज्यामध्ये PVR च्या 51000, INOX-38000 आणि Cinepolis च्या 27500 तिकिटांचा समावेश आहे. त्यामुळे शाहरुख खानचा पठाण बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करू शकतो हे निश्चित आहे.

banner 325x300

पठाणचा पहा ट्रेलर

दरम्यान, 20 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून भारतात पठाणची आगाऊ बुकिंग पूर्णपणे सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत शाहरुखच्या या चित्रपटाच्या तिकिटांच्या आगाऊ बुकिंगच्या आकडेवारीतही मोठी वाढ दिसून येत आहे.

सध्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळत आहे. तसेच पठाणसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. शाहरुखचा कमबॅक चित्रपट ‘पठाण’ 25 जानेवारीला म्हणजेच पुढच्या बुधवारी रिलीज होणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटात शाहरुख खानशिवाय सुपरस्टार जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण हे देखील मुख्य भूमिकेत आहेत.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!