banner 728x90

मुंबई बोट दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक, केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने नुकसान भरपाईची केली घोषणा

banner 468x60

Share This:

Mumbai : मुंबई किनारपट्टीवर बुधवारी नौदलाची स्पीड बोट एका नौकेला धडकल्याने 13 जणांचा मृत्यू झाला, तर 101 जणांना वाचवण्यात यश आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मदत निधीतूनही भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

banner 325x300

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे ज्यांनी आपले प्राण गमावले आहे त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहे. बचाव आणि मदत कार्यात लवकर यश मिळावे आणि वाचलेल्यांच्या जलद पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करेन.

पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना लिहिले आहे की, “मुंबईतील बोट दुर्घटना दुःखद आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. प्रशासनाकडून अपघातग्रस्त लोकांना मदत केली जात आहे.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून, “हा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्याबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो असे देखील ते म्हणाले. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नौदल, तटरक्षक दल आणि मुंबई पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या घटनेची नौदल आणि राज्य सरकारकडून चौकशी केली जाईल.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!