banner 728x90

राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार? संजय राऊतांनी सांगितली आतली बातमी

banner 468x60

Share This:

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची भावनिक साद मराठी माणसाने अनेकवेळा घातली. काही दिवसांपूर्वीच शिवसेना भवनासमोर राज ठाकरे, उद्धव ठाकरे ( Sanjay Raut) यांचा एकत्र फोटो असलेला बॅनर लावून त्यांना एकत्र येण्याची साद घालण्यात आली होती.

नुकतच दोघे एका लग्नाच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या. यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं.

banner 325x300

दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो. अशा भेटी वारंवार घडाव्यात. असं राऊत म्हणाले. मात्र, महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कुणी हातमिळवणी करू नये हे आमचं म्हणणं आहे. शिवसेना फोडून शिंदेंच्या हाती ज्यांनी दिला त्यांच्याशी ठाकऱ्यांनी हात मिळवणी करू नये, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोलाही लगावला.

काय म्हणाले संजय राऊत ?

शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात, रविवारी ठाकरे बंधू एकत्र आले होते. यावेळी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगलाच संवाद रंगला. तिघेहीजण हास्यविनोदात रमलेले दिसले.त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो. अशा भेटी वारंवार घडाव्यात. लोकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा. शेवटी भाऊ आहे, कुटुंब आहे, लहानपणापासून जन्मापासून एकत्र आहेत.

ते जर भेटत राहिले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो. शेवटी ठाकरे आहेत. कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहे. अमित शाह आणि मोदींनी ठरवलंय राज्यातून ठाकरे ब्रँड संपवायचा. हे शाह यांचं स्वप्न आहे. ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि ४० चोरांचा एक पक्ष स्थापन झाला. तरीही ठाकरे ब्रँड सहज कोणाला अमित शाहा सारख्या नेत्याला मिटवता येणार नाही. तुमच्या हाती न्यायालय असेल तर ते होणार नाही. असंही राऊत म्हणाले.

मित्र असण्याचा नाही. हा प्रश्न राजकीय आहे. आमच्यात व्यक्तीश: ही नाती आहेत, भावाचं आणि मित्रत्वाचं नातं आहे, त्यात वाद नाही. महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कुणी हातमिळवणी करू नये हे आमचं म्हणणं आहे. शिवसेना फोडून शिंदेंच्या हाती ज्यांनी दिला त्यांच्याशी ठाकऱ्यांनी हात मिळवणी करू नये. अशा शत्रूशी हात मिळवणी करणं हा महाराष्ट्रातील हुतात्म्याचा अपमान आहे. असेही संजय राऊत यांनी नमूद केलं

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!