पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक राजीव नाना पाटिल यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली अराजकीय सेवाभावी संस्था पालघर जिल्ह्यात उभी राहत आहे.’प्रोटेक्ट एन जि ओ ‘हे संस्थेच नाव असुन या संस्थेत पालघर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाल्याने पालघर जिल्ह्याचे भविष्य उज्ज्वल होईल.
जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर, विमानतळ, टेक्स्टटाईल पार्क, दापचरी – वंकास येथे रिलायन्स चा महाकाय प्रकल्प, बुलेट ट्रेन, विविध महामार्ग याच बरोबर इतरही महाकाय प्रकल्प येत आहेत. चौथ्या मुंबई ची उभारणी होत आहे. स्थानिकांच्या हिताचे रक्षण करतानाच विकासाभिमुख कामासाठी शासनासोबत हि संस्था कार्यरत राहिलं. यामधे स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्यासाठी ‘कौशल्य शिक्षण ‘, पर्यावरण रक्षण, स्थानिक मुलांना नोकऱ्या आणि कॉन्ट्रॅक्ट, एम एस आर डी सी आणि एम एम आर डी ए ची कार्यालये वाणगाव, डहाणू, बोईसर किंवा पालघर ला असावी. बंदरातून स्थानिकांच्या जमिनीला महत्व यावे म्हणुन डहाणू, वाणगाव, बोईसर या रेल्वे स्थानकांना जोडणारे चौपदरी रस्ते तसेच वाढवण ला जोडला जाणारा पश्चिम दृतगती मार्ग हा समृद्धी महामार्गालाही “ग्रिन फिल्ड महामार्ग “म्हणुन जोडला जाणार आहे. या मार्गाला रेल्वे च्या पुर्व आणि पश्चिमेला उत्तर -दक्षिण स्वतंत्र दोन्ही बाजूनी 25 कि. मी. चे चौपदरी रस्ते, अशाच प्रकारे जव्हार- विक्रमगड ते अंबाडी जोडरस्ते बनविल्यास स्थानिक भूमिपुत्र आर्थिक दृष्ट्या समृद्ध होईल. जे एन पि टी ने 1000 बेड च सर्व सोयीनी युक्त हॉस्पिटल बांधून द्यावं. डहाणू पासुन दमण पर्यंत आणि पुढे केळवे रोड दातीवरे पर्यंत मरीन लाईन्स प्रमाणे ‘क्वीन्स नेकलेस कोस्टल हाय वे ‘ बनवावा. अशा विविध विषयावर चर्चा झाली.विकास नियोजन आणि प्रादेशिक विकास आराखडा झाला असल्याने डहाणू पर्यावरण प्राधिकरणा ची आवश्यकता आणि त्यांच्या फक्त शेतकऱ्यांसाठी असलेल्या जाचक अटी रद्द कराव्या.याबाबत सुद्धा चर्चा झाली. यावेळी लोकनियुक्त डहाणू चे नगराध्यक्ष राजू माच्छी, नगरसेवक वरूण पारेख, राजू माच्छी यांचे चिरंजीव अक्षय माच्छी यांचा राजीव नाना पाटिल यांच्या हस्ते डहाणूचे माजी नगराध्यक्ष आणि डहाणू जनता बँकेचे अध्यक्ष मिहीर शहा यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी डहाणू चे माजी नगराध्यक्ष रविंद्र फाटक, मिहीर शहा, शिक्षणमहर्षी आणि उद्योजक मिलिंद पाटिल, वास्तूरचनाकर काळे, सनदी लेखापाल धोंडे, कृषी भुषण रामचंद्र सावे, समन्वयक डॉ. रोमिओ मस्करान्हेस आणि मिलिंद साखरे, ख्यातनाम पोल्ट्री उद्योजक बाटलीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
















