banner 728x90

राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये हालचालींना वेग; महाराष्ट्रातील ‘हे’ नाव आघाडीवर, RSS ची भूमिका काय?

banner 468x60

Share This:

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला आता वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. लवकरच भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 6 नावे चर्चेत असल्याचे समजते आहे.

सध्या जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ 2024 मध्ये संपला आहे. सध्या नड्डा हेच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. तसेच ते केंद्रात मंत्री देखील आहेत. त्यामुळे भाजपच्या अध्यक्षपदाच्या निवडीला देखील वेग आला आहे.

नुकतेच भाजपने अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष निवडले आहेत. पक्षाच्या घटनेनुसार 50 टक्के राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष निवडून झाल्यावरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होते. सध्या भाजपने 26 प्रदेशाध्यक्ष निवडले आहेत. हिमाचल, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, लडाख, तेलंगण, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिव आणि दमण राज्यांचे प्रदेशधयक्ष निवडले आहेत.
भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 6 नावांचा विचार करत असल्याचे समजते आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, मनोहर लाल खट्टर, भूपेंद्र यादव, भाजपचे सरचिटणीस सुनील बांसल तर महाराष्ट्रातून विनोद तावडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. कदाचित भाजप महिला नेत्याचे नाव देखील राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडू शकते.
राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी नेतृत्व संघटनात्मक नेतृत्व, जातीय समीकरणे आणि प्रादेशिक संतुलन या तीन गोष्टी भाजप महत्वाचे लक्षात घेतल्याचे समजते आहे. आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता या तीन गोष्टींकडे गंभीरतेने पाहिले जात आहे. यासाठी भाजप एक केंद्रीय समिती देखील स्थापन करण्याची शक्यता आहे.

भाजपच्या अध्यक्षपदाच्या निवडीत ट्विस्ट; RSS मोठी खेळी करत घेणार निर्णय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे नेतृत्व यांच्यात कोणाला अध्यक्ष करायचे यावरून सहमती होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अध्यक्षाच्या निवडीला उशीर होत असल्याचा अंदाज आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. जे.पी. नड्डा यांना पुन्हा निवडणूक न होताच अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवल्याने संघ नाराज असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्यास लवकरच भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. भाजपमधील अनेक नेते जे.पी. नड्डा यांनाच अध्यक्ष कायम ठेवण्यासाठी आग्रही असल्याचे समजत आहे. तर संघ कदाचित याबाबतीत वेगळी भूमिका घेऊ शकतो.

सध्या भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे, मनोहरलाल खट्टर, स्मृती इराणी यांचे नाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या अध्यक्षपदासाथी तीन महिला नेत्यांची नवे देखील चर्चेत असल्याचे म्हटले जात आहे. कदाचित यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप मिळून वेगळी खेळी खेळू शकतात. महिला नेत्याला अध्यक्षपदी बसवेल जाऊ शकते. त्यामुळे दिल्लीत संघ आणि भाजपमध्ये चर्चा झाल्यास नेमकी राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि भाजपला नवीन अध्यक्ष कधी मिळणार याची स्पष्टता होण्याची शक्यता आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!