banner 728x90

रोहित शर्माने नवा विक्रम रचला, ‘या’ विशेष यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला

banner 468x60

Share This:

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येण्याचे संकेत दिले आहेत. रोहित शर्माची बॅट चांगली चालली होती, पण त्याला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. पण आजच्या सामन्यात रोहित शर्माने ज्या पद्धतीने फलंदाजीला सुरुवात केली, त्यावरून आज रोहित वेगळाच विचार करत आल्याचे स्पष्ट दिसत होते. आज रोहित शर्माचा तोच हिटमॅन अवतार दिसला, जसा तो काही महिन्यांपूर्वी करत होता. रोहित शर्माने आज केवळ शतकच केले नाही तर आणखी एक नवा विक्रमही रचला आहे. रोहित शर्मा आता त्या यादीत सामील झाला आहे, ज्यामध्ये जगभरातील काही निवडक खेळाडू आहेत. युवराज सिंहनंतर आता रोहित शर्मा टीम इंडियाचा नवा सिक्सर किंग म्हणून उदयास आला आहे.

सनथ जयसूर्याला टाकले मागे

banner 325x300

आजच्या सामन्यात रोहित शर्माने आपले शतक पूर्ण केले तोपर्यंत त्याने सहा षटकार ठोकले होते. त्याचा जोडीदार म्हणून मैदानात उतरलेला शुभमन गिलही शानदार फलंदाजी केली आहे. दरम्यान, रोहित शर्माने षटकारांचा नवा विक्रम रचला. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, त्याने श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला मागे टाकण्याचे काम केले आहे. रोहित शर्माच्या नावावर आता 272 षटकार आहेत. तर सनथ जयसूर्याने 270 षटकार ठोकले. सनथ जयसूर्याने 270 षटकार मारण्यासाठी 445 एकदिवसीय सामने खेळले, तर रोहित शर्माने 272 षटकार मारण्यासाठी केवळ 241 एकदिवसीय सामने खेळले. आता वनडेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत केवळ दोनच खेळाडू त्याच्या पुढे आहेत. पहिल्या क्रमांकावर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आहे, ज्याने 398 सामन्यात 351 षटकार ठोकले. दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आहे, ज्याने 301 सामन्यात 331 षटकार ठोकले.

रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने केली कमाल

रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये कमाल करत आहे. रोहित आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 200 हून अधिक धावांची भागीदारी केली होती. या दोघांची ही पहिली द्विशतकी भागीदारी असून दुसरी शतकी भागीदारी आहे. दरम्यान, रोहित शर्मानंतर काही वेळातच शुभमन गिलनेही आपले शतक पूर्ण केले. मात्र, शतक पूर्ण केल्यानंतर काही वेळातच रोहित शर्मा 101 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तसे, रोहित शर्मा भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय शतके करणारा खेळाडू बनला आहे, त्याने एमएस धोनीला मागे टाकले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!