banner 728x90

Satara : ‘लाडकी बहीण’चे एकाच महिलेने भरले 28 अर्ज, गुगलवरून शोधले आधारकार्ड नंबर

banner 468x60

Share This:

प्रतिनिधी सातारा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सातारा जिल्ह्यातील एका महिलेकडून झाल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर तात्काळ सातारा जिल्हा प्रशासनाने लाडकी बहीण योजने अंतर्गत माहिती घेतली.

खटाव तालुक्यातील मायणीच्या एका दाम्पत्याने 28 अर्ज अनधिकृत पद्धतीने अर्ज भरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुगलवरून वेगवेगळे आधार कार्ड नंबर मिळवून तिच्या बँकेचं खातं लाडकी बहीण योजनेच्या अर्जांना जोडले होते.

banner 325x300

याबाबत मिळालेली माहिती अशी की, माहेरचे नाव प्रतीक्षा पोपट जाधव आणि तिचा पती गणेश संजय घाडगे अशी या दाम्पत्याची नावे आहेत. या प्रकरणांमध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. याविषयी सातारा जिल्हा प्रशासनाने त्रिसदस्यीय समिती स्थापन करून संबंधित दांपत्याने भरलेल्या अर्जाची पडताळणी केली. संबंधित महिलेने एकाच नावाने गुगल वरून घेतलेल्या वेगवेगळ्या आधार कार्ड नंबर चा वापर करून माणदेशी महिला बँकेचे खाते अर्जांना संलग्न केले होते. या पडताळणीत 28 अर्जा पैकी एकाच अर्जाची 3000 रुपये रक्कम संबंधित महिलेच्या खात्यावर जमा झाल्याचं समोर आलंय. इतर उरलेल्या कोणत्याही अर्जाचे पैसे बँक खात्यात जमा झालेले नाहीत. या प्रकरणाची जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मात्र या घडलेल्या प्रकारामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

कसं आलं समोर?
खारघर मधील महिला पुजा प्रसाद महामुनी यांच्या आधार कार्डचा गैरवापर झाल्याचं समोर आलं होतं. पनवेल तहसिल कार्यालयात तक्रार केली असता हा प्रकार समोर आला आहे. महामुनी यांचा अर्ज वारंवार भरूनदेखील सबमिट होत नव्हता. त्यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर शोध घेतला असता पुजा महामुनी यांचा अर्ज आधीच अप्रूव्हड झाले असल्याचे समोर आले. मात्र त्यांच्या आधारकार्डला सातारा येथील जाधव नामक व्यक्तिचा मोबाईल नंबर ॲड झाला होता. याबाबत अधिक माहिती मिळवली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे तब्बल 30 अर्ज भरल्याचे दिसून आले. यानंतर सदरची तक्रार पनवेल तहसिलदारांकडे करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!