banner 728x90

शालेय विधार्थी आणि पालक इकडे लक्ष द्या ! पुढील वर्षीच्या शैक्षणिक वर्षात झाला ‘हा’ बदल

banner 468x60

Share This:

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात शालेय शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी वार्षिक परीक्षा साधारणतः एप्रिलच्या मध्यापर्यंत होत असत.

मात्र, नव्या नियमानुसार परीक्षा मार्चपर्यंत पूर्ण करून एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार आहे. स्वतः राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

banner 325x300

दरम्यान शासनाच्या या निर्णयामुळे शैक्षणिक वर्षाचे कामकाज हे 234 दिवसांचे निश्चित करण्यात आले आहे. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी विशेष वर्ग सुद्धा घेतले जाणार असून, शालेय शिक्षणात नव्या सुधारणा करण्याचा निर्धार शासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. नक्कीच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय फारच महत्त्वाचा असून या निर्णयाची विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी नोंद घेणे आवश्यक आहे.

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या बदलांबाबत अधिकची माहिती दिली असून, नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना अधिक नियोजनबद्ध अभ्यास करता येईल, असा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 8 ते 25 एप्रिल या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणी आणि संकलित चाचणी 2 या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत.

मात्र, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांनी परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत लांबणार असल्याने उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी आणि निकाल जाहीर करण्यासाठी वेळ कमी पडेल, अशी चिंता सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्याध्यापक संघ महामंडळाचे पदाधिकारी शिक्षण आयुक्त व एससीईआरटीच्या अधिकाऱ्यांना भेटून वेळापत्रकात सुधारणा करण्याची मागणी करत आहेत.

यामुळे आता याबाबत नेमका काय अंतिम निर्णय होईल, प्रश्नपत्रिका तपासण्यासाठीचा टाईम कसा मॅनेज केला जाईल ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी ठरणार आहे. दरम्यान, उच्च शिक्षण क्षेत्रातही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्याच्या शैक्षणिक प्रणालीनुसार, बीए/बीएस्सी बीएड अभ्यासक्रम हा चार वर्षांचा आहे.

मात्र आता याऐवजी एक नवीन अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. आता चार वर्षांचा एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (आयटीईपी) लागू केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. खरंतर हा अभ्यासक्रम राज्यात सुरू होतोय असे नाही तर शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून हा नवीन अभ्यासक्रम केंद्रीय पातळीवर लागू करण्यात आला आहे.

यामुळे आता यापुढे बीए/बीएससी बीएड (एकात्मिक) अभ्यासक्रम बंद राहणार असून, नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू होणार आहे. पण या नव्या अभ्यासक्रमाची रूपरेषा, प्रवेश प्रक्रिया आणि सामाईक परीक्षा राष्ट्रीय स्तरावर होणार आहेत.

विद्यार्थ्यांना यासाठी एनटीएच्या संकेतस्थळावर नोंदणी सुद्धा करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेकडून हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे राज्यातील सीईटी सेलकडून या अभ्यासक्रमासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार नाही.

याऐवजी, ही परीक्षा एनटीएकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे आधीच सीईटीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रातील या बदलांमुळे नव्या अभ्यासक्रमासाठी अधिक व्यापक पातळीवर तयारी करावी लागणार असल्याचे जाणकार लोकांचे म्हणणे आहे.

एकंदरीत आता एप्रिल पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे आणि त्यासाठी मार्च अखेर पर्यंत परीक्षा पूर्ण केल्या जाणार आहेत. पण या नव्या निर्णयावर विद्यार्थ्यांची काय भूमिका राहणार ? हे पाहणे देखील तितकेच उत्सुकतेचे ठरणार आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!