राज्यातील विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून आज राज्यातही मान्सून दाखल झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु आहे.
मात्र, मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेत पेरणीची घाई करु नये असे आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
या वर्षी मान्सूनचा प्रवास जलद होत आहे. त्यामुळं मान्सून या वर्षी 25 मे ला दक्षिण कोकणात दाखल झाला आहे. यावर्षी साधारणतः 10 दिवस अगोदरच मान्सून राज्यात दाखल झाला आहे. मात्र 27 मे पासून मान्सूनची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील पर्जन्य कमी होणार आहे. अशी माहिती कृषी विभागानं दिली आहे. हळूहळू मान्सून कमी होत जाऊन 5 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
यावर्षी राज्यात मान्सून लवकरच दाखल होणार अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी आणि पिक लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. पावसाचं प्रमाण कमी होणार असल्याने हवामान कोरडे होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली तर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

















