banner 728x90

शुभमन गिलने वनडेमध्ये रचला नवा विक्रम, द्विशतक ठोकणार ठरला पाचवा भारतीय

banner 468x60

Share This:

मुंबई: टीम इंडिया आणि न्यूझीलंड (IND vs NZ ODI) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बुधवारी हैदराबादमध्ये खेळवला गेला. टीम इंडियाने या सामन्यात विजयाने मालिका सुरू केली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) बुधवारी हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजी करताना इतिहास रचला. शुभमन गिलने डावाच्या 49व्या षटकात लोकी फर्ग्युसनच्या चेंडूवर सलग तीन षटकार ठोकून 145 चेंडूत पहिले द्विशतक पूर्ण केले. गिल 149 चेंडूत 208 धावा करून बाद झाला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा शुभमन गिल हा पाचवा भारतीय आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा (तीन), वीरेंद्र सेहवाग आणि ईशान किशन यांनी हा पराक्रम केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दहावे द्विशतक

टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलचे द्विशतक हे वनडे इतिहासातील दहावे द्विशतक आहे. टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर 2010 मध्ये ग्वाल्हेरमध्ये एकदिवसीय इतिहासात द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला. त्यानंतर द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन वेळा द्विशतक झळकावणारा रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे.

वनडेमध्ये द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू

23 वर्षीय युवा फलंदाज शुभमन गिल एकदिवसीय क्रिकेट इतिहासात द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. शुभमन गिलने 149 चेंडूत 208 धावांच्या खेळीत 19 चौकार आणि 9 गगनचुंबी षटकार ठोकले. या खेळीदरम्यान, शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी आणि द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला. याआधी न्यूझीलंडविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सचिन तेंडुलकरने 186 धावांची शानदार खेळी खेळली.

सचिन तेंडुलकर राहिला मागे

टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे आणि वनडेमध्ये टीम इंडियासाठी सर्वात मोठी खेळी खेळण्याच्या बाबतीत तो पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. रोहित शर्मा (264), वीरेंद्र सेहवाग (219), इशान किशन (210), रोहित शर्मा (209), रोहित शर्मा (208), शुभमन गिल (208) नंतर पाचव्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकर नाबाद 200* धावांसह टॉप 5 मधून बाहेर पडला आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!