banner 728x90

नेतृत्वाची गरुडझेप भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त विषेश संपादकीय

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

banner 325x300

जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले! तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा! असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलं असलं, तरी आता नव्यानं नेतृत्वाची व्याख्या अशीच करण्याची वेळ आली आहे. जो सामान्यांच्या मदतीसाठी धावून येतो, जो त्यांची सेवा करतो, जो त्यांना संकटातून बाहेर काढतो आणि जो सातत्यानं जनतेच्या सोबत राहतो, त्यालाच नेता म्हणावं असं म्हटलं, तर वावगं ठरणार नाही. संत तुकारामांच्या अभंगात थोडासा बदल करून नेत्याच्या केलेल्या व्याख्येत पालघरचे भारतीय जनता पक्षाचे नेते भरत राजपूत अगदी तंतोतंत बसतात. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

‘चाणक्य नीती’मध्ये चांगला नेता कसा असावा, त्याच्यात कोणते गुण असावेत, याचा उल्लेख केला आहे. चाणक्याने एका श्लोकामध्ये नेत्याची तुलना गरुडाबरोबर केली आहे. जेव्हा नेता गरुड झेप घेतो, तेव्हा तो आपल्या अनुयायांनाही झेप घ्यायला भाग पाडतो. नेत्याची गरुडझेप ही समाजाच्या प्रगतीची झेप असते. नेता जमिनीवर असेल, त्याला जमिनीवरच्या परिस्थितीची जाणीव असेल आणि त्या परिस्थितीतून लोकांना बाहेर काढून गरुडाप्रमाणे झेप घेण्याची त्याची महत्वकांक्षा असेल, तर त्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. भरत राजपूत यांच्या बाबतीतही ते खरं आहे .मूळच्या काँग्रेसच्या विचाराच्या असलेल्या भरत राजपूत यांनी बरोबर दहा वर्षांपूर्वी काँग्रेस सोडली. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान महासचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. डाव्यांच्या बालेकिल्ल्यातच कमळ फुलवण्याचं यश त्यांच्या खात्यावर नोंदवल जातं. डहाणू नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम दखलपात्र ठरलं. अशक्यही शक्य करू शकतो हा नेत्याचा गुण असतो, असं चाणक्यानं सांगितलं. हे गुणवैशिष्ट्य भरत राजपूत यांच्याकडं आहे. गुणी व्यक्ती त्याच्या दिखाव्यामुळं ओळखली जात नाही, तर तिच्या अंगी असलेल्या गुणवत्ता आणि योग्यतेमुळं ती ओळखली जाते. चाणक्य सांगतात, की मोठ्या पदावर असलेली व्यक्तीच चांगला नेता होतो असं नाही, तर कोणतीही सामान्य व्यक्ती चांगली नेता होऊ शकते, ती आपल्या कौशल्याच्या जोरावर. घराच्या छतावर बसल्यामुळं जसा कावळा गरूड होत नाही, तसंच केवळ मोठ्या पदावर बसल्यानं किंवा धनवान असल्यानं व्यक्ती महान होत नाही.

बुद्धिवादी, गुणी आणि समजूतदार व्यक्ती आपल्या गुणाचा कधीच दिखावा करत नाही किंवा बडेजाव मिरवत नाही. गुणी लोक हिऱ्यासारखे चमकत असतात. कोळशाच्या खाली ते दुरून दिसतात. मोठ्यामोठ्या बाता मारणारे आणि स्वतःचं कौतुक करणारे दुसऱ्यांच्या नजरेतून आपली किंमत कमी करत असतात. नेत्यांचे हे अवगुण असतात. भरत राजपूत यांना या अवगुणांनी स्पर्श केला नाही. ते सातत्यानं माणसात राहिले. माणसाचे प्रश्न समजून घेतले आणि आपल्या पदाचा वापर करून त्या प्रश्नांची त्यांनी सोडवणूक केली. एक सुंदर फुल फक्त नेत्रसुख देतं; पण एक सुगंधी फुल कित्येक लोकांना प्रसन्नता देतं. त्यांचा ताण कमी करतं. चांगल्या नेत्यात सुंदर फुलापेक्षा सुगंधी फुलाचे गुण असतात. अशा नेत्याची गुणवत्ता चौफेर पसरत असते. भरत राजपूत यांच्या बाबतीतही ते खरं आहे .नेतृत्व हा माणसाचा एक विशेष गुण आहे. सर्व प्राणी पात्रांमध्ये स्वसुखासाठी धडपड करण्याची जन्मजात क्षमता असते. माणसंही त्याला अपवाद नाहीत; परंतु स्वसुखापेक्षा समाजाच्या सुखासाठी झटणारा वेगळाच असतो, त्याला तर नेता म्हणतात. भरत राजपूत यांच्या ठायी है वैशिष्ट्य आहे. नेतृत्व जन्माला येतं आणि नेता घडतो. असे नेते कमी असतात हे स्वाभाविकच आहे. कारण नेतृत्वासाठी काही गुण अंगी असणं आवश्यक असतं. भरत राजपूत यांच्या अंगी अशा अष्टपैलू कुणाचा खजिना आहे. ते स्वतःच्या स्वार्थापलीकडे पाहू शकतात. हे ज्याला जमतं तो चांगला नेता होऊ शकतो. कुटुंबाच्या हितासाठी स्वतःचा स्वार्थ आणि समाजाच्या हितासाठी कुटुंबाचा स्वार्थ बाजूला ठेवण्याची ज्याची तयारी असते, तोच आदर्श नेता होतो. असे आदर्श नेतृत्वगुण राजपूत यांच्या अंगी निश्चित आहे. समाजाच्या भल्यासाठी भविष्यातील संकटाच्या अंदाज घेऊन त्याची अगोदरच उपाययोजना करण्याचं करण्याची दूरदृष्टी त्यांच्याकडं आहे. नेता केवळ भाषण करून किंवा चांगलं व्याख्यानं देऊन होत नाही. तो अगोदर चांगला श्रोता असावा लागतो. समाजाचं, कार्यकर्त्यांचं, अनुयायांचं त्यांनाच ऐकावं लागतं. ऐकण्याच्या बाबतीत त्यानं लहान मोठा असा भेदभाव कधीही करून चालत नाही, याची जाणीव भरत राजपूत यांना चांगलीच आहे.

चांगला नेता आपल्या प्रत्येक कृतीची जबाबदारी घ्यायला तयार असतो. अपयशाची जबाबदारी तो स्वतःच घेतो. त्याचा दोष इतरांवर लागत नाही आणि यशाच्या वेळी आपल्या लोकांना विसरत नाही. निरपेक्षपणं काम करणं आणि केवळ सत्याच्या आधारेच न्याय देणं हे नेत्याचं कौशल्य असतं. ते राजपूत यांच्याकडं नक्की आहे. अडचणीच्याच नव्हे, तर आनंदाच्या काळातही चांगला नेता कधीच चुकीचं काम करीत नाही. कोणत्याही व कोणाच्याही दबावाखाली तो येत नाही. त्याचे निर्णय पूर्वग्रहदूषित नसतात आणि स्वार्थानं बरबटलेले नसतात. तो कायम कणखर असतो आणि त्याची कणखरता त्याच्या प्रत्येक कृतीत जाणवते. पक्षासाठी प्रसंगी कटुता घेण्याची त्याची तयारी असावी लागते. भरत राजपूत यांच्याकडं ती आहे. जेव्हा पालघर लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करत होता, त्या वेळी शिवसेनेनं हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला आकडेवारीनिशी उत्तर देण्याचं आणि वरिष्ठांपर्यंत प्रयत्न करून हा मतदारसंघ भाजपासाठी खेचून आणण्याचं महत्त्वाचं काम भरत राजपूत यांनी केलं. केवळ उमेदवारी मिळवण्यावर त्यांनी समाधान मानलं नाही. सर्वात शेवटी डॉ. हेमंत सवरा यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना निवडून आणण्यासाठी राजपूत यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. उमेदवारी एकदा भाजपला मिळाली, की संपलं यावर त्यांनी समाधान मानलं नाही. मित्र पक्षात समन्वय घडवण्याचं काम त्यांनी केलं. केवळ ते कामसांगेच आहेत, असं नाही, तर प्रसंगी मैदानात उतरायलाही कमी करत नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपला यश मिळवून दिलं. डॉ. सवरा यांच्यासाठी ५० सभा घेऊन त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला. कोरोना काळात समुद्रात अडकून पडलेल्या १४ हजार आदिवासी मजुरांची सुटका करून त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात मोलाचं योगदान त्यांनी दिलं होतं. नेतृत्वाचा मतदारसंघ आणि जिल्ह्यावर किती पगडा असावा आणि त्याचा त्यांचा किती अभ्यास असावा हे राजपूत यांच्या वक्तव्यावरून दिसून येतं. त्यांनी व्यक्त केलेले अंदाजही तंतोतंत ठरले आहेत.
पालघर लोकसभा मतदारसंघात डॉ. सवरा यांना जेव्हा भाजपची उमेदवार जाहीर झाली, तेव्हा त्यांनी ठामपणे दीड लाख मतांनी सवरा निवडून येतील, असं सांगितलं. प्रत्यक्षात एक लाख ६५ हजार मतांनी डॉ. सवरा निवडून आले. यावरून मतदार संघाची मानसिकता नेमकी काय आहे हे त्यांना किती अचूक कळलं आहे हे दिसतं. विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी अशीच ठाम भूमिका घेतली. विक्रमगड मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली. त्याचा फटका महायुतीचे भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र भोये यांना बसेल की काय अशी शक्यता व्यक्त होत होती; परंतु सुरुवातीपासूनच भरत राजपूत यांनी मात्र बंडखोरीचा फायदा उलट भाजपलाच होईल आणि हरिश्चंद्र भोये २५ हजार मतांनी निवडून येतील असं सांगितलं आणि प्रत्यक्षात घडलंही तसंच. पालघर जिल्ह्यात हितेंद्र ठाकूर यांचं साम्राज्य होतं त्यांच्या साम्राज्याला तडा जाईल असं कुणालाही वाटत नव्हतं. जिल्ह्यातील सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघांवर ठाकूर यांचं वर्चस्व होतं. अशा परिस्थितीत राजपूत मात्र ठामपणे पालघर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहापैकी सहा जागा आम्ही मिळवू, असं सांगत होते. प्रत्यक्षात डहाणू विधानसभा मतदारसंघाची एक जागा वगळली तर उर्वरित पाचही जागा महायुतीला मिळाल्या. विनोद तावडे यांच्या बाबतीत आमदार ठाकूर पिता पुत्रांनी ज्या प्रकारे राडा केला, त्याला अवघ्या काही तासात बहुजन विकास आघाडीचा उमेदवारच भाजपच आणून राजपूत यांनी तोडीस तोड उत्तर दिलं. राजपूत यांचं काम पाहून तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्कारांनं सन्मानित करण्यात आलं होतं. कोरोनाच्या काळात राजपूत यांनी आपला व आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात धोक्यात घालून डहाणू व परिसरातील लोकांना निवारण व उपचारासाठी मदत केली, कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी अरबी समुद्रात अडकलेल्या आदिवासी समाजातील सुमारे १४ हजार लोकांना प्रशासनाच्या मदतीनं सुखरूप बाहेर काढलं आणि त्यांना त्यांच्या घरी पोहोचत केलं. भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचा सन्मान केला होता. राज्यपालांनी सन्मान केला, तेव्हा या सन्मानाला उत्तर देताना राजपूत म्हणाले होते, की हा सत्कार माझा नाही,तर माझ्या हातून झालेल्या कार्याचा गौरव आहे. हाच सर्वात मोठा धर्म आहे. माझ्यासोबत सामाजिक कार्य करण्यास जे सदैव तत्पर आहेत, त्यांच्या कृतीचा हा सन्मान आहे. एका पक्षाची विचारधारा असली, तरी कोणताही भेदभाव न करता लोकांना मदत करत राहण्याची आणि सामाजिक कार्य करत राहण्याची त्यांची कृती ही निश्चितच समाजाला वेगळी दिशा देणारी आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!