banner 728x90

कर्तृत्ववान नेता, योगेश चांदेकर यांच्या लेखणीतून विशेष संपादकीय

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

banner 325x300

पालघर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुंबईकडील राजधानी म्हणून असलेली डोंबिवलीची ओळख आणि या मातीत झालेले संस्कार घेऊन राजकारणात उरलेले रवींद्र चव्हाण राज्याच्या बांधकाम विभागाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात महायुती रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूरला असले तरी पुणे आणि डोंबिवलीसारखी शहरं ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रयोगशाळा मानली जातात. या शहरात पूर्वीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम चालते. डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांच्यावर संघाचे संस्कार झालेले. भारतीय जनता पक्षात एक एक पायरी चढत ते वर गेले. डोंबिवलीतून आमदार झाले. आमदार झाल्यानंतर त्यांनी ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संघटन केलं. भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम त्यांनी केलं. मुळात कल्याण आणि डोंबिवली हा पूर्वीपासूनच संघाचा पर्यायानं भाजपचा बालेकिल्ला होता. जनता पक्षाचं या भागात वर्चस्व होतं. प्रा. रामभाऊ माळगी आणि प्रा. राम कापसे यांचे हे बालेकिल्ले. तिथं भाजपचे विचार खोलवर रुजलेले आहेत. काही वर्षांपूर्वी जरी कल्याणमध्ये शिवसेनेचा जोर वाढला असला, तरी अद्यापही भाजपची पाळंमुळं तिथे रुजलेली आहेत. याच भाजपला ठाणे-कल्याण परिसरातून दूर सारण्याचा प्रयत्न युतीच्या काळात मध्यंतरी झाला; परंतु आपल्या रोखठोक स्वभावामुळे आणि संघटनात्मक चातुर्यामुळं रवींद्र चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवली. एवढं नव्हे, तर ठाणे जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघ भाजपकडं घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यात यश आलं नसलं, तरी गेल्या काही वर्षात मात्र भाजपची घोडदौड वेगानं करण्यामध्ये चव्हाण यांचं मोठं योगदान आहे. दोन दोन जिल्ह्याचं पालकमंत्रिपद भूषवत असतानाही भाजपचं संघटन वाढवण्यावर त्यांचा भर असतो. पालघर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नसताना लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडून भाजपकडं घेऊन तिथं निष्ठावान डॉ. हेमंत सवरा यांना पावणेदोन लाख मतांच्या फरकानं निवडून आणण्यात चव्हाण यांची रणनीती उपयोगी पडली. बहुजन विकास आघाडीनं चव्हाण यांच्यावर कितीही आरोप केले, तरी या आरोपांनी डगमगून न जाता त्यांना जशास तसं उत्तर देऊ,न बदनामीची केस दाखल करून आपल्यातील मनोधैर्य किती उंचीचं आहे, हे त्यांनी दाखवून दिलं.

चव्हाण हे महाराष्ट्रातील भाजपचे चाणक्य देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्ती असल्यानं महाराष्ट्रात विकासकामं मार्गी लावण्यात त्याचा त्यांना उपयोग होतो. महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. प्रसंगी टीकाही सहन करावी लागते. अशा टीकेच्या वेळी कोणी व्यक्तिगत हल्ला केला, तर त्याला तितक्याच समर्थपणे उत्तर देताना आपला नेताही आपल्या मागं किती खंबीरपणे उभा आहे, हे चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरच्या संदर्भात शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या आरोपाच्या वेळी दाखवून दिलं. ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची किंवा अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करताना चव्हाण यांचा शब्द कसा अंतिम होता, हे दिसलं. नवी मुंबई संदीप नाईक, मीरा-भाईंदरला किशोर शर्मा, भिवंडीत ॲडव्होकेट हर्षल पाटील आणि उल्हासनगरला प्रदीप रामचंद्रांनी यांची नावं पुढं करून चव्हाण सांगतील तेच धोरण आणि ते बांधतील ते तोरण अशा पद्धतीनं भाजपची वाटचाल सुरू आहे याचे संकेत मिळाले. पदाधिकारी निवडीत भाकरी फिरवल्यानंतर किती फायदा झाला, हे महायुतीला मिळालेल्या यशामुळे दिसतं. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा अपवाद वगळता अन्य सर्व ठिकाणी भाजप, शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाला कोकणात मिळालेल्या यशामुळं दिसलं. कल्याण परिसरात शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वाद होता. कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात महायुतीत कलह होता. अशावेळी चव्हाण यांनी मात्र अतिशय चातुर्यानं काम करून महायुतीमधील दरी आणखी रुंदावणार नाही, याची दक्षता घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यांशी चांगला समन्वय ठेवून शिवसेनेच्या शिंदे गटातल्या पदाधिकाऱ्यांची नाराजी कशी दूर करता येईल, याचा ताळमेळ ते घालू शकले. ठाण्यातसुद्धा महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्याशी चव्हाण यांनी कमालीचे चांगले संबंध ठेवले. निरंजन डावखरे यांच्यासोबत सातत्यानं संपर्क ठेवला. कल्याण डोंबिवलीच्या अध्यक्षपदी नरेंद्र सूर्यवंशी यांची आणि उल्हासनगरमध्ये नियुक्ती करताना भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून प्रदीप रामचंद्रांनी यांना संधी देण्यात आली. रामचंद्रांनी आणि स्थानिक आमदार कुमार आयालानी नाही यांच्यात फारसं सख्य नसताना चव्हाण यांनी मात्र आपलं वजन रामचंद्रानी यांच्या बाजूनं खर्च करून भाकरी फिरवून संघटनात्मक बांधणीवर जोर दिला. नव्या मुंबईत गणेश नाईक यांच्या कुटुंबीयांपैकी कुणालाही भाजपच्या स्थानिक अध्यक्षपदासाठी संधी देऊ नये, असा आग्रह स्वपक्षाच्या आमदार मंदा मात्रे यांच्या गटानं धरला असताना तिथंही संदीप नाईक यांची नियुक्ती करून पक्षवाढीला चालना कशी देता येईल, याचा विचार चव्हाण यांनी केला होता. शिवसेनेनंकडं ठाणे आणि कल्याण या लोकसभेच्या दोन्ही जागा गेल्या. या दोन्ही जागांवर भाजप दावा करत होता; परंतु या जागा सोडताना पालघर ताब्यात घेऊन तिथं कमळ फुलवण्याचं महत्त्वाचं काम चव्हाण यांनी केलं.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सरकारनं नव्यानं सुरू केलेलं महामंडळ यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला फारशी कामं काम राहिली नाहीत. त्यात महायुतीतच रस्सीखेच सुरू असताना आपल्या हाती जे आहे, त्याचा वापर करून त्याचं सोनं करण्याची कला चव्हाण यांच्या अंगी आहे. यातून त्यांनी मोठ्या प्रमाणात विकासाची कामं मार्गी लावली. मुख्यमंत्री शिंदे यांचं ठाणे जिल्ह्यावर वाचलेलं वर्चस्व आणि भाजपकडून चव्हाण यांचं असलेले वर्चस्व यातून महायुतीची मूठ बांधणं आणि विकास कामात स्पर्धा करतानाही त्यात नुकसान कसं होणार नाही, यावर चव्हाण यांनी सातत्यानं लक्ष दिलं. नागरी पुरवठा मंत्री म्हणूनही त्यांनी चांगलं काम केलं. आनंदाचा शिधा योजना व्यवस्थित राबवण्यासाठी त्यांच्या संकल्पना उपयोगी पडल्या. चव्हाण ठाणे जिल्ह्याचे असताना त्यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हवं होतं; परंतु ते न मिळाल्याचं दुःख न मानता ज्या भागात संधी मिळाली, त्या भागाला पूर्ण न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. मुख्यमंत्री शिंदे गटाच्या राजेंद्र गावित यांना भाजपत आणताना महायुतीत कोणताही बेबनाव होणार नाही, याची दखल त्यांनी घेऊन बेरजेचं राजकारण करण्यावर त्यांभर होता. त्याचा फायदा पालघर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत महायुतीला झाला. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात महत्त्वाच्या असलेल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी कसा मिळवता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जिल्हा रुग्णालयांचं आधुनिकरण असो की अन्य काम; त्यांनी सातत्यानं त्यावर लक्ष देऊन ही काम वेळेत कशी पूर्ण करता येईल यावर भर दिला. चव्हाण हे मंत्री असले, तरी अद्यापही त्यांचं संघटनात्मक काम अतिशय चांगलं आहे. त्यांच्या जीवनावर ‘जे पाहता रवी’ या नावाचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. ‘जे पाहता रवी’ या पुस्तकात चव्हाण यांच्या जीवनाचा लेखाजोखा मांडण्यात आला असून एक सामान्य कार्यकर्ता ते आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री अशा त्यांच्या राजकीय प्रवासाचा आलेख या पुस्तकात आहे. या पुस्तकात शिक्षण, क्रीडा, राजकारण, सामाजिक, कला आदी क्षेत्रात चव्हाण यांनी कसा ठसा उठवला, त्यांची जीवनशैली कशी आहे आणि त्यांची कार्यपद्धती काय आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्याला चव्हाण कसे दिसले, त्यांचा अनुभव कसा आला आणि हा नेता सामानातला सामान्य कसा आहे, हे या पुस्तकातून दिसतं. चव्हाण यांना मंत्रिपदाची पदाची घमेंड नाही. ते एक साधे नेते असून त्यांचे पाय नेहमी जमिनीवर राहतात. पक्षीय राजकारण करतानाही समाजकारणाला त्यांचं अगोदर प्राधान्य असतं.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!