महाराष्ट्रात काही दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतर आता पुन्हा पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. ही स्थिती आगामी दोन दिवस अशीच राहणार असून पालघर जिल्ह्यात हवामान विभागान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.त्यामुळे येथे आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
कसा असेल आज महाराष्ट्रातील इतर भागात पाऊस अन् हवामान
मराठवाडा
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम ते मुसळधार पाऊस आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.
कोकण
काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.
मध्य महाराष्ट्र
उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभाग मुंबईकडून यासंदर्भात एक्सवर पोस्ट करण्यात आली आहे.
पालघरमध्ये अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at a few places with extremely beavy rainfall at Isolated places) रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून पालधर जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालये यांना सोमवारी 7 जुलै 2025 रोजी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरण पालघर डॉ. इंद्र राणी जाखड़ यांनी लेखी आदेश दिले आहेत.
शासन परिपत्रकानुसार, पालघर जिल्ह्यात अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा सर्व आश्रमशाळा सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्राच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना आज 07.07.2025 रोजी सुट्टी जाहिर झाली आहे.
जायकवाडीत पाणीपातळीत वाढ
जायकवाडी पैठण येथील नाथसागराच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.आज 7 जुलै 2025 रोजी सकाळी 6 वाजतापाणी पातळी 52:36% (फुटात -1512) (1522 पैकी) तर गेल्या 24 तासात पाण्याची आवक 24 हजार 192 क्युसेकने झाली आहे.