banner 728x90

राज्यसभेचा रणसंग्राम! भाजपचे संभाव्य नावं समोर, शिंदेंचा दे धक्का, आघाडीत बिघाडी कायम

banner 468x60

Share This:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच अकाली निधन झाल्याने राज्यातील राजकारणाची सर्वच पातळीवर अनेक समिकरण बदललेत असं सध्याचं चित्र आहे. नुकत्याच राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली.

त्यामध्ये संख्याबळाच्या आधारावर महायुतीचं पारडं जड आहे. महायुतीमधील घटक पक्षांमध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल याची आशा आणि चर्चा असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी कुणाला संधी द्यायची यावर अंतिम निर्णय होणार आहे. त्यातच आता काही संभाव्य नावंही समोर आल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

भाजप राज्यसभेच्या रिंगणात एकूण चार उमेदवार उतरवणार असून, त्यातील एका जागेवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. उर्वरित तीन जागांसाठी भाजपच्या गोटात जोरदार खलबते सुरू आहेत.यामध्ये विनोद तावडे, विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांच्या नावांची चर्चा होणार असून, पक्षश्रेष्ठींच्या संमतीनंतर ही यादी प्रसिद्ध केली जाईल असं बोललं जातय. परंतु, काही नाव दबक्या आवाजात चर्चीली जात असून भाजप अनेकांना धक्का देऊन वेगळीच नावही समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एकूण 56 आमदार आहेत. त्यांची एक जागा निवडून येऊन 18 अधिकची मते शिल्लक राहत आहेत. शिंदेसेनेमध्ये अनेकांनी आपल्याला संधी भेटावी म्हणून फिल्डींग लावली आहे. यामध्ये माजी खासदार गजानन कीर्तीकर आघाडीवर आहेत. त्यापाठोपाठ राहुल शेवाळे आणि संजय निरुपम हे देखील राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे उमेदवारीसाठी पक्षांतर्गत चुरस वाढली आहे. यावर अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेणार आहेत. दरम्यान, आकड्यांचं गणित पाहिलं तर भाजपकडे अधिकची १६ मतं आहेत तर शिवसेनेकडे अधिकची तब्बल 18 मतं आहेत. आता शिवसेना अधिकची 18 मतं भाजपला देणार की भाजप अधिकची 16 मते शिवसेनेला देणार याकडं सर्वांचं लक्ष आहे.

त्याचबरोबर, अजितदादाचं निधन झाल्याने त्यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या सदस्य होत्या. आता त्या उपमुख्यमंत्री झाल्याने या सदस्यत्वाचा त्यांना राजीनामा देऊन सहा महिन्यांत विधानसभेवर निवडून यावलं लागणार आहे. दरम्यान, त्यांची जी राज्यसभेची जागा रिकामी होत आहे त्यावर आता त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांना पाठवण्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे माहयुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या राज्यसभेच्या जागेचा प्रश्न सुटल्यात जमा आहे.

मुद्दा आणि उलट-सुलट चर्चा रंगली आहे ती महाविकास आघाडीमध्ये. सर्व आकड्यांचं गणित पाहता. एक जागा वाट्याला येत आहे. या जागेसाठी आता कोण? असा मोठा प्रश्न मविआच्या गोटात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवारांनी आपल्याला पुन्हा राज्यसभेवर जायचं आहे अशी इच्छा व्यक्त केल्याचं म्हणत त्यांना ही जागा दिली पाहिजे अशी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली होती. परंतु, गेल्या वीस ते पंचवस दिवसांत शरद पवारांना दोनवेळा रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. दरम्यान, शरद पवार यांनी किंवा त्यांच्या पक्षातील कोणत्याच नेत्यांने ठोस असं काही वक्तव्य आणखीतरी केलंलं नाही. त्यामुळे त्यांच्या तब्येतचा विचार करता ते आता काय निर्णय घेतात याकडं सर्वांच लक्ष आहे.

एकूणच, महाराष्ट्रातील राजकीय वातावरण या निवडणुकांमुळं तापलं असून, अजितदादांच्या निधनाने अनेक समिकरण बदलले आहेत. महायुतीत सर्व निर्णय झाल्यासारख वातावरण असलं तरी अंतिम काहीच नाही आणि महाविकाक आघाडीकडं जागा एक आणि इच्छूक अगणित अशी स्थिती असल्याने आता आकड्यांच्या या गणितात कोण कुणावर डाव टाकतय आणि कोण बाजी मारतय हे लवकच कळणार आहे.

banner 325x300

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!