banner 728x90

राज्य मंत्रीमंडळ बैठकीमध्ये 14 तगडे निर्णय, मुंबई-पुण्यासह ठाण्याला फायदाच फायदा!

banner 468x60

Share This:

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज झालेल्या सामाजिक न्याय, ऊर्जा, कामगार, आदिवासी विकास, नगर विकास आणि विधि व न्याय विभागांशी संबंधित १४ महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे.

या निर्णयांमुळे सामाजिक समावेशकता, पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरमधील मेट्रो आणि रेल्वे प्रकल्पांपासून ते दिव्यांगांच्या कल्याणापर्यंत आणि उच्च न्यायालयाच्या नव्या संकुलापर्यंत, हे निर्णय राज्याच्या प्रगतीला नवी दिशा देणारे ठरतील. या निर्णयांचा सविस्तर आढावा घेऊया.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले 14 तगडे निर्णय

सामाजिक न्याय विभाग

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात 1 हजार रुपयांची वाढ तसेच, लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार ऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार आहेत.

ऊर्जा विभाग

महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापराबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले.

कामगार विभाग

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा केली आहे.
कारखाने अधिनियम, 1948 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

banner 325x300


आदिवासी विकास विभाग

अनुसूचित जमातीतील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करणार आहे.


नगर विकास विभाग

– मुंबईतील आणिक डेपो- वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका- 11 प्रकल्पास मान्यता. तसेच 23 हजार 487 कोटी 51 लाख रुपयांची तरतूद दिली आहे.


– ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुण्यातील मेट्रो मार्गिका – 2, मार्गिका – 4 तसेच नागपूर मेट्रोच्या टप्पा दोनच्या कर्जांस मान्यता दिली आहे.
ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, स्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, वनाज ते रामवाडी (मार्गिका क्र. २) च्या विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी), पुणे मेट्रो मार्ग-४ (खडकवासला स्वारगेट हडपसर-खराडी) आणि नळ स्टॉप वारजे-माणिकबाग (उपमार्गिका) व नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा-२ या मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी घेण्यात येणाऱ्या बाह्यसहाय्यित कर्जाचे आकस्मिक दायित्व स्वीकारण्यास, प्रकल्पांचे करारनामा, कर्ज करारनामा आणि दुय्यम वित्तीय करारनामे करण्यास मान्यता.


या पुणे मेट्रोवरील बालाजीनगर, बिबवेवाडी या दोन नवीन स्थानकांना मंजूरी दिली आहे. स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर बालाजीनगर व बिबवेवाडी ही दोन नवीन मेट्रो स्थानके उभारण्यास आणि कात्रज मेट्रो स्थानकाचे दक्षिणेकडे सुमारे 421 मीटरने स्थलांतरण करण्यास व यासाठीच्या 683 कोटी 11 लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता.
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३ (MUTP-3) व ३अ (MUTP-3A) प्रकल्पातील लोकल (उपनगरीय रेल्वे) गाड्यांच्या खरेदीसाठी कर्जास मान्यता मिळाली आहे. तसेच बाह्य सहाय्यित कर्ज घेण्याऐवजी पूर्णतः रेल्वे व राज्य शासनाच्या निधीतून सहाय्य देण्यास, तसेच त्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने 50% आर्थिक सहभाग देण्यास मान्यता दिली.


– मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP- 3B) या प्रकल्पातील राज्य शासनाच्या 50 टक्के आर्थिक सहभागास मान्यता मिळाली आहे.
पुणे ते लोणावळा लोकल (उपनगरीय रेल्वे) च्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिका प्रकल्प खर्चाची तरतूद करणार आहेत. तसेच मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या धर्तीवर आर्थिक भार उचलणार आहेत.
ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग, तसेच हा प्रकल्प सिडको महामंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक-खाजगी-भागीदारी (PPP) अंतर्गत BOT (Build Operate – Transfer) तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.
“नविन नागपूर” अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्तीय केंद्र विकसित करणार आहे. तसेच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मौजा गोधणी (रिठी) व मौजा लाडगांव (रिठी), तालुका हिंगणा जि. नागपूर येथील एकूण अंदाजे क्षेत्र 692.06 हे. आर. जागा संपादित करून सार्वजनिक हितार्थ “नविन नागपूर” अंतर्गत “International Business and Finance Centre (IBFC)” विकसीत करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यास तत्वत मान्यता मिळाली आहे.
नागपूर शहराभोवती बाहय वळण रस्ता (Outer Ring Road) व त्यालगत चार वाहतूक बेटांची निर्मिती, तसेच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नागपूर शहराभोवती बाहय वळण रस्ता (Outer Ring Road) व त्यालगत 4 वाहतूक बेट (Truck & Bus Terminal) विकसित करणार आहे.


विधि व न्याय विभाग

मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील उच्च न्यायालयाच्या नवीन संकुल बांधकामाच्या खर्चास मान्यता दिली आहे. प्रकल्पासाठी 3 हजार 750 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता झाली आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!