मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारला आणखी एक यश प्राप्त झाले. महाराष्ट्र सरकारने कॅपिटललँड इन्व्हेसमेंट लिमिटेड कंपनीशी यशस्वीपणे सामंजस्य करार केला आहे.
जागतिक दर्जाच्या या रिअल असेट मॅनेजमेंट कंपनीने महाराष्ट्रात या कराराअंतर्गत 2030 पर्यंत 19200 कोटी रुपये गुंतवणूक महाराष्ट्रात करण्याची घोषणा केली आहे. त्या कराराला अखेर मुर्तस्वरूप मिळाले. मुंबई पुणे या शहरात ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. ही घोषणा नवी मुंबईतील एका कार्यक्रमात आज करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिंगापूरचे उपपंतप्रधान जान किम योंग, सीएलआयचे चेअरमन मनोहर खैतानी हे देखील कार्यक्रमात उपस्थित होते. प्रसिद्धीपत्र काद्वारे सांगण्यात आल्याप्रमाणे कंपनीची 2013 पासून उपस्थिती पुण्यातील हिंजेवाडी भागात आहे. इंटरनॅशनल टेक पार्क नावाने हा प्रकल्प सुरु झाला होता. त्यामुळे कंपनीने आपले पाऊल विस्तारण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत या कंपनीने मुंबई, पुण्यात 6800 कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आता आगामी काळात आणखी 19 हजार कोटींची गुंतवणूक कंपनी करणार आहे. व्यवस्थापना अंतर्गत गुंतवणूकीत सध्याच्या 8 अब्ज डॉलरवरून वाढ करत 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. ही वाढ 2028 पर्यंत होणे अपेक्षित आहे असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले गेले आहे. ही गुंतवणूक औद्योगिक संकुल, लॉजिस्टिकस पायाउभारणी, डेटा सेंटर उभारणीसाठी होणार आहे. सीएलआयची पहिली पसंती महाराष्ट्रा ला देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील औद्योगिक पोषक वातावरण पाहता आगामी आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्च र पाहता कंपनीने गुंतवणूकीचा निर्णय घेतला आहे.
या गुंतवणूकीवर भाष्य करताना सीएलआय इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव दासगुप्ता म्हणाले की, भारत हा सीएलआयसाठी एक प्रमुख बाजारपेठ आहे आणि महाराष्ट्र, त्याच्या मजबूत आर्थिक मूलभूत गोष्टी आणि सुविकसित आयटी आणि औद्योगिक परिसंस्थेसह आमच्यासाठी आमचा ठसा वाढवण्याच्या महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून देतो. गेल्या दशकात राज्य आमच्या विकास प्रवासात एक स्थिर भागीदार राहिले आहे आणि आम्हाला मिळालेल्या मजबूत पाठिंब्याची आणि सहकार्याची आम्ही कदर करतो. आम्ही आमच्या सूचीबद्ध ट्रस्ट, आमचे खाजगी निधी प्लॅटफॉर्मद्वारे महाराष्ट्रात आमची गुंतवणूक वाढवत राहू. आम्ही आमची भागीदारी मजबूत करण्यास आणि महाराष्ट्राच्या व्यावसायिक आणि औद्योगिक विकासात आणखी योगदान देण्यास उत्सुक आहोत.
जागतिक कौशल्याचे संयोजन
तीन दशकांहून अधिक काळापासून भारतात असलेल्या उपस्थितीमुळे, सीएलआय एकात्मिक रिअल अँसेट मॅनेजर, डेव्हलपर आणि ऑपरेटर म्हणून काम करण्यासाठी अद्वितीय स्थितीत आहे, जे उच्च-गुणवत्तेचे, शाश्वत प्रकल्प प्रदान करण्यासाठी मजबूत स्थानिक भागीदारीसह जागतिक कौशल्याचे संयोजन करते.