banner 728x90

टीम इंडियाला मोठा झटका! जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, संघ नव्याने जाहीर

banner 468x60

Share This:

भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मोहिमेला मोठा झटका बसला आहे. संघातील विजयाचा हुकमी एक्का स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही आणि त्याची जागा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा घेईल.

१९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार असून भारताची पहिली लढत २० तारखेला बांगलादेशविरुद्ध होणार आहे तर २३ तारखेला टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहे.

banner 325x300

चॅम्पियन्स ट्रॉफी संघात झालेला आणखी एक बदल म्हणजे युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल नाव अंतिम १५ खेळाडूंच्या यादीतून वगळण्यात आले असून त्याच्या जागी वरुण चक्रवर्तीला संधी देण्यात आली आहे. मात्र राखीव खेळाडूंच्या यादीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे यांच्यासोबत त्याचा समावेश करण्यात आला आहे. हे तिघे संघासोबत दुबईला जाणार नाहीत, त्यांची गरज पडल्यास संघात बोलावले जाऊ शकते.

कर्णधार रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल आणि त्याचा सलामीचा जोडीदार शुभमन गिल उपकर्णधार असेल. स्टार फलंदाज विराट कोहली आणि श्रेयस अय्यर फलंदाजी क्रमाला बळकटी देतील. विकेटकीपर आणि फलंदाज म्हणून संघात ऋषभ पंत आणि केएल राहुल हे दोन पर्याय असतील.

गोलंदाजी विभागात रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर हे फिरकीपटू असतील तर ऑलराउंडर हार्दिक पांड्या हा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंगला साथ देईल.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!