राज्यात पाच महिन्यांहून अधिक काळ पावसानं थैमान घातल्यानंतर आता हाच पाऊस परतीच्या प्रवासाला अतिप्रचंड वेगानं निघाला आणि जाता जाता मोठं नुकसानही करून गेला.
या नुकसानातून सावरत असतानाच आता निसर्गाचा आणखी एक मारा नागरिकांना सहन करावा लागत आहे. तो म्हणजे प्रचंड उकाड्याचा. पावसाचं प्रमाण कमी होऊन एकाएकी राज्यात तापमानवाढ झाल्याचं स्पष्ट होत आहे. ज्यामुळं ‘ऑक्टोबर हिट’चा एकंदर दाह पाहता हा उकाडा अनेकांनाच सोसेनासा होताना दिसत आहे.
का वाढला उकाडा?
अरबी समुद्राच्या मध्य पश्चिमेकडे असणाऱ्या भागावरील कमी दाबाचं क्षेत्र निवळलं असून, या भागामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती मात्र कायम आहे. ज्यामुळं किनारपट्टी भागांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. हे पावसाळी ढग भासत असले तरीही ते बरसणार नसून, उलटपक्षी हवेतील आर्द्रतेचं प्रमाण आणखी वाढल्यानं नागरिकांना उष्मा आणखी जाणवणार आहे हेच प्राथमिक हवामान अंदाजातून स्पष्ट होत आहे.
यंदाच्या वर्षी मे महिन्यात उडाका फारसा जाणवला नाही, कारण उकाडा जिथं परमोच्च शिखरावर असतो त्याच मे महिन्याच्या उत्तरार्धात मान्सूननं देशात दमदार हजेरी लावली. महाराष्ट्रातही चित्र वेगळं नव्हतं. मात्र आता मे महिन्याची ही कसर ऑक्टोबरमध्ये भरून निघते की काय? हाच प्रश्न सूर्याची दाहकता पाहता उपस्थित केला जाचत आहे. पुढील काही दिवस उष्णतेचा हा कहर सुरूच राहणार असून, यादरम्यान होणाऱ्या हवामान बदलांमुळं नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहनही यंत्रणांनी केलं आहे.
राहिला प्रश्न पावसाचा, तर पश्चिम विदर्भात पावसानं पूर्णत: उघडीप दिली असून, जळगाव, हिंगोली, धुळे इथंही पावसाचा अंदाज नाही. मुंबई शहर आणि उपनगरांनाही पावसाचा कोणताच इशारा नाही, तर कोकणातही चित्र वेगळं नसल्यानं आता उष्णतेशी दोन हात करण्यासाठीच सज्ज व्हा! हा थेट इशारा हवामान विभागाकडून दिला जात आहे.
राज्यात अचानक उकाडा का वाढला?
अरबी समुद्राच्या मध्य पश्चिमेकडे असणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रानं निवळलं असलं तरी चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. यामुळे किनारपट्टी भागात आकाश अंशतः ढगाळ राहील, पण पाऊस पडणार नाही. उलट, हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे उष्णता अधिक जाणवेल.
यंदा मे महिन्यात उकाडा का कमी जाणवला?
मे महिन्याच्या उत्तरार्धात मान्सूननं देशात आणि महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली, ज्यामुळे उकाड्याचा प्रभाव कमी झाला. परंपरागत मे हा उकाड्याचा शिखर महिना असतो, पण यंदा पावसानं त्याची कसर भरली.
पावसाचा अंदाज काय आहे?
पश्चिम विदर्भात पावसानं पूर्ण उघडीप दिली आहे. जळगाव, हिंगोली, धुळे, मुंबई शहर-उपनगर आणि कोकणातही पावसाचा कोणताच इशारा नाही.
















