banner 728x90

डहाणू पंचायत समितीचा कारभार रामभरोसे ; सभापती-उपसभापतींचे नियंत्रण नसल्याने अधिकाऱ्यांचे फावले

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर


गैरकारभाराला अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे अभय?
शासनाच्या तिजोरीवर डल्ला

banner 325x300

पालघरः डहाणू तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायतीच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली असताना अनेक ग्रामपंचायतीतही अशाच प्रकारचा कारभार सुरू असल्याची चर्चा आहे. पंचायत समितीचे सभापती प्रवीण गवळी यांच्या रायपूर गावातील अजब कारभाराचा नमुना उघडकीस आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला जात असताना त्याकडे सभापतींचेही लक्ष नव्हते. उपसभापती पिंटू गहला यांची परिस्थिती ही अशीच आहे.
सभापती, उपसभापतींचे प्रशासनावर आणि एकूणच ग्रामपंचायतींच्या कारभारावर नियंत्रण नसल्यामुळे अधिकाऱ्यांचे फावले आहे. अधिकारी मनमानी कारभार करत असून ते जिल्हा परिषदेला ही उत्तरदायी नसल्याचे एकूणच ग्रामपंचायतच्या कारभारावरून लक्षात येते. एकीकडे ग्रामपंचायतींना ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक मिळत नसताना दुसरीकडे मात्र एकाच गावात दोन-दोन ग्रामविकास अधिकारी ठाण मांडून बसल्याचे चित्र आहे.

गैरकारभाराला अभय?
अर्जित रजेवर गेलेला ग्रामविकास अधिकारी परत आल्यानंतर पदभार घेत नसल्याचा आरोप दुसरा ग्रामविकास अधिकारी करीत असताना दुसरा ग्रामविकास अधिकारीच पदभार सोडत नसल्याचा आरोप पहिला ग्रामविकास अधिकारी करीत आहे. या आरोप प्रत्यारोपात सरकारचे पैसे फुकट जात असून गेल्या सहा महिन्यांपासून काम न करता ग्रामविकास अधिकाऱ्याला फुकट वेतन दिले जात आहे. हा अंदाधुंदी कारभार सुरू असताना सभापती प्रवीण गवळी यांचे पंचायत समितीसोबतच स्वतःच्या गावावरही लक्ष नसल्याचे चित्र आहे. गावावर त्यांचे लक्ष नाही, की गावातील गैरकारभाराला त्यांचे अभय आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

गटविकास अधिकाऱ्यांमुळे जिल्हा परिषदही अंधारात
रायपूर ग्रामपंचायतीचा कारभार नमुन्यादाखल असून डहाणू तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतीतही अशाच प्रकारचा कारभार होत असल्याचा संशय आहे. स्वतःच्या ग्रामपंचायतीतील कारभाराकडे लक्ष नसणारे पदाधिकारी तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतींकडे काय लक्ष देणार, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्याचबरोबर एखादा ग्रामविकास अधिकारी पदभार सोडत नसेल आणि दुसरा एखादा ग्रामविकास अधिकारी पदभार घेत नसेल, तर त्याकडे सहा महिने गटविकास अधिकारी ही कसे दुर्लक्ष करू शकतात, असा सवाल उपस्थित होत असून. दोन्ही ग्रामविकास अधिकारी ऐकत नसतील, तर गटविकास अधिकारी हेमंत गरिबे यांनी याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना का पाठवला नाही, असा प्रश्न उपस्थित होतोय

जगताप यांनीच लक्ष घालण्याची आवश्यकता
उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी आता त डहाणू तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या कारभाराची चौकशी करून त्याबाबत ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे. रायपूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी वसंत कृष्णा गायकवाड हे ३०ऑक्टोबर २०२३ ते ३० जानेवारी २०२४ पर्यंत अर्जित रजेवर होते. ही रजा संपल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा हाती घेणे आवश्यक असताना ते केवळ कार्यालयात येऊन गेले. त्यांच्या रजेच्या काळात चंदू डोंगरकर यांच्याकडे ग्रामविकास अधिकारीपदाचा तात्पुरता कार्यभार होता. पूर्वीचे ग्रामविकास अधिकारी गायकवाड हजर झाल्यानंतर डोंगरकर यांनी त्यांच्याकडील पदभार पुन्हा गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करणे आवश्यक असताना त्यांनी तसे केले नाही.

काम न करता घेतलेल्या वेतनाची वसुली आवश्यक
या दोन्ही ग्रामविकास अधिकाऱ्यांचा दोष असतानाही गेले सहा महिने डहाणूच्या गटविकास अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि आता त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. वास्तविक गेले सहा महिने फुकटचे वेतन घेणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करून शासनाच्या या रकमेची वसुली करायला हवी होती. त्याकडे कानाडोळा केला जात आहे.

शिसणे ग्रामपंचायतीच्या चौकशीची मागणी
डोंगरकर यांच्याकडे ज्या शिसणे ग्रामपंचायतीचा पदभार आहे, त्या ग्रामपंचायतीच्या दप्तराची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी रायपूर आणि शिसणे या दोन्ही ग्रामपंचातीत काही गैरप्रकार केला का, याची चौकशी करण्याची मागणी आता पुढे आली आहे. पदभार न सोडण्यामागे गैरव्यवहार हे कारण असण्याची शक्यता आहे. पंचायत समितीचे सभापती याकडे दुर्लक्ष करीत असतील, तर त्यात त्यांचे काही हितसंबंध गुंतले आहेत का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!