banner 728x90

आजचे राशिभविष्य: तुळसह २ राशींच्या खर्चात वाढ! गुंतवणुकीतून फायदा, वाचा बुधवारचे राशीभविष्य

banner 468x60

Share This:

Aaj che Rashi Bhavishya 2 october 2024 :
आज २ ऑक्टोबर बुधवार असून सर्वपित्री अमावस्या आहे. सर्वार्थ सिद्धी योगासह इंद्र योग आणि ब्रह्म योगाचा शुभ संयोग तयार होत आहे. तुळसह २ राशींच्या खर्चात वाढ होईल. वडिलांच्या सल्ल्याने वाद मिटतील. स्वत: साठी काही वस्तू खरेदी कराल. आरोग्याची काळजी घ्याल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याने पुरेपूर फायदा होईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. शेजारी काही वाद असतील ते टाळा. व्यावसायिक लोक नवीन गोष्टी करतील. भविष्यात तुम्हाला फायदा होईल. परीक्षेत यश मिळवण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. पालकांसोबत फिरायला जाल. मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल.

मेष – आरोग्याची काळजी घ्या

banner 325x300

आज विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मित्रांसोबत मज्जा नंतर करा. कौटुंबिक वातावरण तणाव पूर्ण असेल. वडिलांच्या सल्ल्याने वाद मिटतील. स्वत: साठी काही वस्तू खरेदी कराल. आरोग्याची काळजी घ्याल.
आज भाग्य ९८ टक्के तुमच्या बाजूने असेल. तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा

वृषभ – गुंतवणुकीतून फायदा

आज तुम्हाला व्यवसायासाठी सरकारकडून चांगली बातमी मिळेल. त्यामुळे चांगला नफा होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहिल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याने पुरेपूर फायदा होईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. शेजारी काही वाद असतील ते टाळा.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. पांढरी वस्तू दान करा

मिथुन – यश मिळेल

आज तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. नवीन गोष्टीसाठी जुन्याकडे दुर्लक्ष होईल. दुपारनंतर चांगली बातमी मिळेल. व्यावसायिक लोक नवीन गोष्टी करतील. भविष्यात तुम्हाला फायदा होईल. परीक्षेत यश मिळवण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. पालकांसोबत फिरायला जाल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्यासोबत असेल. शिवलिंगावर दूध अर्पण करा

कर्क – वाद मिटेल

आज जोडीदार तुम्हाला सरप्राईज पार्टी देईल. तुम्हाला नवीन भेटवस्तू मिळू शकते. व्यवसायात कोणतीही जोखीम पत्करू नका. भविष्यात नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वाद संपुष्टात येतील. कुटुंबातील परस्पर प्रेम वाढेल. मित्रांसोबत वेळ घालवाल.
आज भाग्य ९४ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला हिरवा चारा खाऊ घाला.

सिंह – बोलण्यावर नियंत्रण ठेवा

आज तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी नवीन योजना बनवाल. ज्याचा तुम्हाला फायदा होईल. कुटुंबात वैचारिक मतभेद होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नात्यात दुरावा येईल. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांशी वाद होतील. मित्रांकडून फायदा होईल.

आज भाग्य ९० टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडावर दूध मिश्रित पाणी अर्पण करा

कन्या – तणाव संपेल

आज तुमचा तणाव संपेल. व्यवसायात प्रामाणिकपणे काम करावे लागेल. तरच तुम्हाला नफा मिळेल. गरजू व्यक्तींना मदत कराल. मनापासून काम केल्याने लाभ होईल. व्यस्त जीवनशैलीतून जोडीदारासाठी वेळ काढाल. जोडीदार तुमच्यासोबत आनंदी राहिल.
आज भाग्य ७० टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला जल अर्पण करा

तुळ – खर्च वाढेल

आज व्यवसायात चांगली बातमी मिळेल. कोणताही करार बराच काळापासून अडकला असेल तो पूर्ण होईल. आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला सावध राहावे लागेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. घरगुती खर्च थोडा वाढेल. पैशांचा व्यवहार करताना विचारपूर्वक करा, नुकसान होऊ शकते.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुच्या मंदिरात चण्याची डाळ आणि गुळ पिवळ्या कपड्यातून बांधून अर्पण करा

वृश्चिक – कामाची चिंता दूर होईल.

आज तुम्हाला प्रवास करण्याची संधी मिळेल. त्यामुळे आनंदी असाल. संध्याकाळी काही शुभ कार्यात सहभागी व्हाल. प्रभावशाली लोकांसोबत भेट होईल. ज्यामुळे महत्त्वाच्या कामाची चिंता दूर होईल. नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्यांना रोजगाराच्या संधी मिळतील. कुटुंबात पार्टीचे आयोजन केले जाईल.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना वस्त्र किंवा अन्नदान करा

धनु- कर्ज घ्यावे लागेल

आज तुम्हाला बँकेकडून किंवा कुणाकडून कर्ज घ्यावे लागेल. काही खर्चांना सामोरे जावे लागेल. बचतीकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सासरच्या लोकांकडून मानसन्मान मिळेल. प्रवासात महत्त्वाची कामे पार पडतील. सहकार्याने फायदा होईल.
आज भाग्य ८४ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला चपाती खाऊ घाला.

मकर – वाद होतील

आज कुटुंबातील सदस्यांशी वाद होतील. एखाद्याला पैसे उधार देताना नीट विचार कराल. नोकरीच्या ठिकाणी तुमची परिस्थिती सुधारेल. व्यवसायात लाभाची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील. जोडीदारासोबत फिरायला जाल.

आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना तांदूळ दान करा

कुंभ – पैशांची कमतरता जाणवेल

आज तुम्हाला नोकरीत टीमवर्कने काम करावे लागेल. ज्यामुळे फायदा होईल. व्यवसायात काही वाद सुरु असतील ते चर्चेने सोडवाल. आज तुम्ही मित्रांसाठी भेटवस्तू खरेदी कराल. तुम्हाला उत्पन्न लक्षात ठेवावे लागेल. पालकांची सेवा करण्यात वेळ घालवाल. पैशांची कमतरता जाणवेल. मुलांची तब्येत बिघडू शकते.
आज भाग्य ६३ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिव चालीसाचे पठण करा

मीन – पार्टनरशीपमध्ये फायदा

आज तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरदार लोकांना सावध राहावे लागेल. शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न कराल. खर्च करण्याऐवजी कुटुंबासोबत वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्य नाराज होतील. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करणे चांगले राहिल.
आज भाग्य ९८ टक्के तुमच्या बाजूने राहिल. तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!