पालघर-योगेश चांदेकर
आदिवासी तरुणांना दिली रोजगाराची दिशा
पालघरः अमेरिकेतून परत आल्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे या भावनेतून कॅप्टन सत्यमभाई ठाकूर विचार करत होते. त्याच काळात काही आदिवासी युवक त्यांना भेटले. पोलिस आणि गृहरक्षक दलात जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. या युवकांचे संपूर्ण जीवन घडविण्यात सत्यमभाईंचा मोठा वाटा आहे आणि आदिवासी विभागातील काही तरुणांना आपण योग्य मार्गाला लावून त्यांना नवी दिशा देऊ शकलो असे मत त्यांनी व्यक्त केले.
पालघर हा आदिवासी जिल्हा आहे. या जिल्ह्यातील आदिवासी युवकांमध्ये मोठी क्षमता आहे; परंतु योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने पुढील भविष्यात काय निर्णय घ्यावे याबाबत अनेक अडचणी निर्माण होतात अशा परिस्थितीत डहाणूतील काही आदिवासी युवक सत्यम ठाकूर राहत असलेल्या डहाणू तालूक्यातील दाभोन गावात त्यांना भेटायला आले आणि पोलिस तसेच गृहरक्षक दलात समावेश होण्यासाठी मदत करा, असे साकडे त्यांना घातले होते.
प्रशिक्षणासह सर्व जबाबदारी
सत्यम ठाकूर यांनी युवकांना मदत करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. केवळ मार्गदर्शन नाही, तर या युवकांना पोलिस आणि गृहरक्षक दलाचे जवान होण्यासाठी त्यांनी त्यांना संपूर्ण मार्गदर्शन तर केलेच; शिवाय त्यांनी त्यांच्या डहाणू येथील प्रशिक्षण निवास व अन्य बाबींची जबाबदारी घेतली. आर्थिक मदतही केली. त्यांच्या या सहकार्यामुळेच ते युवक पोलिस दलात नियुक्त झाले. काही जण गृहरक्षक दलात कार्यरत आहेत.
गावातील युवकांना दिली नवी दिशा
सत्यम ठाकूर गावातील इतर काही लोकांनाही अशाच प्रकारे मदत केली. त्यातील वीस युवक पोलिस आणि गृह रक्षक दलात नोकरी करत आहेत. या युवकांनी सत्यमभाईं ठाकूर भेट घेतल्यानंतर आपण केलेल्या कामाचे चीज झाल्याचे समाधान त्यांना वाटते. सत्यमभाईंचा सत्कार करायला आलेल्या युवकांचा सत्यमभाईंनीच सत्कार करून तुमच्यामुळेच मला समाजकार्याची संधी मिळाली अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
‘पालघर जिल्ह्यात आदिवासी युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या युवकांकडे क्षमता असली, तरी त्यांना योग्य मार्गदर्शन संधी आणि आर्थिक मदत मिळत नाही. सरकारच्या अनेक योजना असूनही त्यांची माहिती त्यांना नसते. हे युवक माझ्याकडे आल्यानंतर त्यांना मी माझ्या परीने मदत केली आणि त्यातून ते रोजगाराला लागले, याचे मोठे समाधान मला आहे.
कॅ.सत्यमभाई ठाकूर, सामाजीक कार्यकर्ते