banner 728x90

आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार का? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ उत्तर

banner 468x60

Share This:

राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीची निवडणूक घोषित झाली आहे. लवकरच महानगरपालिकांची निवडणूक देखील घोषित होईल. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांची आता राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे.

शिवसेना (ठाकरे) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन ही निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची (ठाकरे) सत्ता आली तर आदित्य ठाकरे हे महापौर होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या या चर्चेवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमध्ये त्यांच्या शेतीचे किती नुकसान झाले आणि शासनाकडून काही मदत मिळाली का, याची विचारणा ते करत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीला व्होटंबदी करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

शेतकऱ्यांसोबतच्या संवाद दौऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्या महापौरपदाच्या चर्चेवर थेट उत्तर दिले आहे. ते म्हणाले, या बातमीचा उगम कुठून झाला हे मला जाणून घ्यायचं होतं, आणि ते मला कळलं आहे. या अफवेचा उगम संघातून झाला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच ते म्हणाले की, अहमदाबाद शहराचे नाव बदलायचे आहे आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांना अहमदाबादचा महापौर करावं लागले, अशी संघात चर्चा सुरू आहे. आता मला बघायचे आहे की अहमदाबादचा महापौर अमित शहा होणार की नरेंद्र मोदी, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेचे आमदार आहेत. दुसऱ्यांदा ते या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 2009 मध्ये आदित्य ठाकरे यानी राजकारणात प्रवेश केला आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला. आदित्य ठाकरे यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. तेव्हा शिवसेना एकत्रित होती, त्यामुळे धनुष्यबाण हे त्यांचे चिन्ह होते. निवडणूक लढवणारे पहिले ठाकरे म्हणून आदित्य ठाकरे ओळखले जातात. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पर्यावरण आणि पर्यटन खात्याचे ते मंत्री होते. दुसऱ्यांदा 2024 विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते वरळीतून उमेदवार होते. यावेळी त्यांनी मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली आणि जिंकली. 35 वर्षांचे आदित्य ठाकरे हे सध्या आमदार आणि युवासेना प्रमुख आहेत.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!