banner 728x90

“वसई-विरारच्या महिलांसाठी आनंदाची बातमी”

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पाठपुराव्याला यश : १ जूनपासून बस प्रवासावर महिलांना ५०% सवलत

banner 325x300

पालघर-महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार एस.टी. प्रवासात महिलांना ५०% सवलत दिली जात असून, MMRDA क्षेत्रातील ठाणे व नवी मुंबई महापालिकांनी या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना अद्याप ही सवलत मिळत नव्हती.

या मुद्द्याची गांभीर्याने दखल घेत वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी महिलांसाठी बस प्रवासात ५०% सवलत मिळावी यासाठी परिवहन प्रताप सरनाईक जी, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे जी व वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला.

या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून, आज दिनांक २३ मे रोजी महापालिका मुख्यालयात आयुक्त अनिलकुमार पवार यांनी अधिकृत पत्राद्वारे कळविले की, ०१ जून २०२५ पासून वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना बस प्रवासाच्या तिकिटात ५०% सवलत देण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे वसई-विरारमधील हजारो महिला प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार असून, या यशस्वी पाठपुराव्याबद्दल परिसरातील महिलांकडून वसईच्या आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांचे विशेष कौतुक केले जात आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!