banner 728x90

वेदांत जाधवर यांच्या पुस्तकाचे आय पी एस विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून कौतुक

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

अनसंग मदर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन’ या पुस्तकात १५ महिलांच्या कार्याची दखल

banner 325x300

संविधान निर्मितीतील महिलांच्या दुर्लक्षित कर्तृत्वाला उजाळा

पालघरः भारतीय संविधान घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १५ उल्लेखनीय महिलांची दखल वेदांत जाधवर यांनी त्यांच्या ‘अनसंग मदर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन’ या पुस्तकात घेतली आहे. त्यांच्या या पुस्तकातील संशोधन आणि आकर्षक कथाकथनातून भारतीय लोकशाहीच्या उत्क्रांतीच्या आधारस्तंभ असलेल्या महिलांना प्रकाशझोतात आणले आहे. या पुस्तकाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी कौतुक केले आहे.

वेदांत जाधवर हे कायद्याचे विद्यार्थी असून लेखक आणि संशोधकही आहेत. त्यांनी संविधानाचा अभ्यास केला असून भारतीय इतिहासाची त्यांना आवड आहे. मुंबईतील मिठीबाई कॉलेजमधून त्यांनी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून बीएलएस आणि एलएलबी च्या दुसऱ्या वर्षात शिकत असून वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी ऐतिहासिक पुस्तक लिहिले असून शैक्षणिक प्रवासासोबतच त्यांच्यात असलेली उत्सुकता संपवण्यासाठी वेगवेगळ्या अभ्यास आणि संशोधन केले.

महिलांच्या योगदानाला उजाळा
वेदांत यांनी शहर आणि ग्रामीण भारताचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. प्रशासन, न्याय आणि सामाजिक बदल याबाबत त्यांचा एक व्यापक दृष्टिकोन तयार झाला आहे. त्यातून शहरांच्या आकांक्षा आणि खेड्यामध्ये संघर्ष पाहिल्यानंतर कायदा आणि धोरण लोकांच्या जीवनाला कसा आधार देतात, हे त्यांनी काढले. त्यातून महिलांच्या संविधानातील सहभागाची प्रेरक कथा समोर आणण्याची इच्छा त्यांना झाली, त्यातूनच राष्ट्र उभारणीच्या कार्यात अनेक महिलांनी योगदान दिले; परंतु त्यांच्या योगदानाची इतिहासाने फारशी दखल घेतली नाही; किंबहुना महिलांचे हे योगदान उपेक्षित राहिले.

राष्ट्र घडवण्यातील महिलांचा सहभाग
भारतीय संविधानात महत्त्वाचे योगदान देऊनही उपेक्षित राहिलेल्या महिलांना प्रकाशझोतात आणण्याचे काम वेदांत जाधवर यांनी त्यांच्या पुस्तकातून केले आहे. लिंग समानता, सामाजिक न्याय आणि वैयक्तिक हक्क यासारख्या तत्त्वांचे त्यांनी समर्थन केले. त्यांचे हे पुस्तक फक्त इतिहासाचे पुस्तक नाही, तर राष्ट्र घडवण्यात महिलांनी दाखवलेल्या प्रयत्नांचा त्यांच्या दूरदृष्टीचा आणि महिलांच्या योगदानाचा खास उल्लेख त्यात करण्यात आला आहे. वेदांत जाधवर यांचे ‘अनसंग मदर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन’ हे पहिले पुस्तक असून या पुस्तकांची अनेकांनी प्रशंसा केली आहे. भारतीय लोकशाहीच्या उत्क्रांतीच्या आवश्यक आधारस्तंभ असलेल्या महिलांना प्रकाशझोतात आणण्याचे त्यांचे केलेले हे काम असाधारण असून त्यांच्या या प्रयत्नांचे आता मान्यवरांनी कौतुक केले आहे.सदरचे पुस्तक Bare Bones Publishing, New Delhi यांनी प्रकाशित केले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!