banner 728x90

तुम्ही कोणते धान्य खातात, घरात किती फोन आहेत? जनगणनेत प्रथमच विचारणार हे ६ नवीन प्रश्न

banner 468x60

Share This:

भारतात 2027 मध्ये जनगणना होणार आहे. देशात होणाऱ्या या जनगणेनेतून देशाची सामाजिक, आर्थिक आणि जनसांख्यिकीय माहिती समोर येणार आहे. ही जनगणना अनेक अर्थांनी महत्वाची असणार आहे. कारण ही प्रथमच पूर्ण डिजिटल माध्यमातून होणार आहे.

तसेच स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातीय जनगणनाही होणार आहे. 1931 नंतर प्रथमच जातीय जनगणनाचा डेटा जमा करण्यात येणार आहे. या जनगणनेमध्ये काही नवीन प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्यात इंटरनेट कनेक्शन, मोबाइल आणि स्मार्टफोन, पिण्याचे पाण्याचे स्त्रोत, गॅस कनेक्शन, वाहनांची उपलब्धता, घरात वापरण्यात येणारे धान्य हे प्रश्न असणार आहेत.

ही आहेत ती सहा प्रश्न

1) घरात इंटरनेट कनेक्शन आहे का? घरात इंटरनेट कनेक्शनच्या प्रश्नाच्या माध्यमातून डिजिटल कनेक्टिव्हीटीची माहिती घेणे आहे. देशातील किती परिवारांकडे इंटरनेट कनेक्शन आहे. त्याचा वापर किती डिव्हाइससोबत केला जातो. हा डेटा डिजिटल इंडियाच्या प्रगतीसाठी उपयोगी असणार आहे.
2) मोबाइल फोन आणि स्मार्टफोन? मोबाइल फोन आणि स्मार्टफोनच्या प्रश्नाच्या माध्यमातून किती परिवाराकडे आणि परिवारातील किती व्यक्तींकडे हे फोन आहे, त्याची माहिती घेतली जाणार आहे. हा डेटा मोबाइल आणि स्मार्टफोन किती लोकांपर्यंत पोहचला आणि त्याचा उपयोग शिक्षण, डिजिटल सेवेसाठी कसा करता येईल, त्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
3) घरात पिण्याचे पाणी? घरात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत महत्वाचे आहे. यामधून आरोग्य आणि स्वच्छता याबाबतची माहिती मिळेल. किती परिवार विहिरी, बोअरवेल, नळ, बॉटल बंद पाणी याचा उपयोग करतात, याची माहिती सरकारला जमा करायची आहे. यामुळे जल जीवन मिशन योजनेची प्रगती समजणार आहे.
4) गॅस कनेक्शन ? घरात गॅस कनेक्शन कोणते आहे त्याचा डेटा जमा करणार आहे. एलपीजी, पीएनजी, लाकडे याचा वापर किती केला जातो, ते सरकार पाहणार आहे. स्वच्छ ऊर्जा आणि उज्ज्वला योजना या कार्यक्रमासाठी हे महत्वाचे आहे.
5) कोणते वाहन आहे? परिवाराकडे कोणते वाहन आहे या प्रश्नातून सायकल, स्कूटर, मोटरसायकल, कार, जीप याची माहिती एकत्र केली जाणार आहे. हा डेटा परिवहन आणि आर्थिक परिस्थितीच्या विश्लेषणासाठी महत्वाचा ठरणार आहे.
6) कोणते धान्य वापरतात? अन्न सुरक्षा आणि पोषण ही परिस्थिती समजून घेण्यासाठी हा प्रश्न समाविष्ट केला आहे.घरांमध्ये प्रामुख्याने गहू, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी किंवा इतर कोणती धान्ये वापरली जातात? ती माहिती सरकारला हवी आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!