banner 728x90

अंतराळात उपग्रह सोडणाऱ्या अंजुचा शिवसेनेकडून सत्कार; शिक्षणासाठी केली ‘आर्थिक’ मदत

banner 468x60

Share This:

डहाणू : योगेश चांदेकर – डहाणू तालुक्‍यातील आंबिवली येथील घरची हलाखीची परिस्थिती असलेल्या अंजू कमलाकर भोईर या विद्यार्थिनीने स्वतःच्या हाताने उपग्रह बनवून तो अंतराळात सोडल्यामुळे संपूर्ण भारतात तिचे कौतुक होत आहे. शिवसेनेनेही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करून तिच्या पाठीवर मायेचा हात फिरवला. यावेळी तिला आर्थिक मदतही केली. भविष्यात तिच्या शिक्षणासाठी व तिला लागणाऱ्या उपक्रमांसाठी आर्थिक मदत करणार असल्याचे ठोस आश्वासन विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे यांनी तिच्या कुटुंबाला दिल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी वैभव संखे व शिवसेनेचे आभार मानले आहेत. शिवसेना नेहमीच अशा सर्वांच्या पाठीशी असते. त्याचबरोबरीने मंजूच्या पाठीशीही तुम्ही सर्व ठामपणे उभे असल्यामुळे आमचा विश्वास आणखीन खंबीर झाली असल्याची प्रतिक्रिया तिचे वडील कमळाकर भोईर यांनी दिली आहे. वैभव संखे यांच्यासह जिल्हा परिषदेचे गटनेते जयेंद्र दुबळा, तालुका प्रमुख अशोक भोईर, युवासेना जिल्हा समन्वयक  हेमंत धर्मामेहेर, कल्पेश पिंपळे यांनी मंजू हीच्या घरी जाऊन पालघर जिल्ह्यातर्फे तिचा जाहीर सत्कार केला व शिवसेना तिच्या पाठीशी खंबीर असल्याचा शब्दही दिला. मंजुला दिलेले प्रोत्साहन पाहून ती भारावून गेली व शिवसेनेच्या या सत्काराबद्दल तिने सर्वांचे आभारही मानले.

 ७ फेब्रुवारी रोजी रामेश्वरम  येथून लहान लहान १०० उपग्रह अंतराळात सोडून एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. यात देशभरातून १००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामुळे भारतामध्ये एक हजार विद्यार्थ्यांनी अंतराळात पाठवलेल्या उपग्रहामध्ये अंजु या विद्यार्थिनीचा ही समावेश आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन व असिस्ट रेकॉर्ड्स अशा पाच जागतिक रेकॉर्ड मध्ये या उपक्रमाची नोंद केली गेली आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!