जव्हार: २७ जुलै २०२३ रोजी झालेल्या महापुरात जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खरोंडा पैकी माडविहरा ते हुंबरण या रस्त्यावरील दोन पूल वाहून गेले. या घटनेला जवळपास तीन वर्षांचा कालावधी लोटला, मात्र, अद्याप या पुलांचे काम सुरू झालेले नसल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे माडविहरा-हुंबरण रस्त्यावर श्रमदानातून तात्पुरत्या पुलाची उभारणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. पावसाळा तोंडावर असताना यंदाही पूल न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होईल, अशी नाराजी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गणपत भेसकर यांनी व्यक्त केली आहे.या पुलांबाबत जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली असल्याचे ही भेस्कर यांनी सांगितले, दरम्यान, चौकशी केली असता निधी उपलब्ध नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितले आहे. त्यामुळे यंदाही माडविहरा ते हुंबरण दरम्यान ये-जा करणाऱ्या रहिवाशांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत.
शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी तसेच दैनंदिन गरजांसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून पुलांच्या अभावामुळे पावसाळ्यात संपर्क पूर्णतः तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. माडविहरा ते हुंबरण दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात दगड व मातीचा भराव टाकून श्रमदानातून पुलाची उभारणी करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र हा उपाय केवळ तात्पुरता असून कायमस्वरूपी आणि सुरक्षित पुलांची तातडीने उभारणी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

माडविहरा-हुंबरण रस्त्यावर श्रमदानातून तात्पुरत्या पुलाची उभारणी
Recommendation for You

Post Views : 134 माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा…

Post Views : 134 पालघर-योगेश चांदेकर पालघर– शिक्षणाची गंगा केवळ शहरांच्या भिंतींपुरती मर्यादित न राहता…

Post Views : 134 शुक्रवारी दुष्काळासंदर्भात जीआर काढला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत…

Post Views : 134 पालघर-योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नामांकित सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिला…













zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg